Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरमधील एका हृदयद्रावक घटनेने सर्वांचे डोळे पाणावले आहेत. काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगरावर आत्महत्या करत असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झालाय. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या मुलाच्या आईनेही आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, त्यांचा पाळीव कुत्रा 'शेरू' तब्बल तीन दिवस घरातच एकटा राहिला होता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जालन्यात झोका खेळताना पाचवीच्या मुलाला लागला फास, हृदयद्रावक घटनेत मृत्यू
शेरूला पाहून नागरिकांचे डोळे पाणावले
कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर घराला कुलूप होते आणि शेरू आतच अडकून पडला होता. या तीन दिवसांत तो केवळ आपल्या मालकांच्या परतण्याची वाट पाहत होता. दारापाशी कोणाचीही चाहूल लागली की तो आशेने तिथे धावत जात असे. शेवटी, जेव्हा शेरूचे आजोबा तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना पाहून शेरू अत्यंत भावुक झाला आणि त्यांच्या अंगावर धावून गेला. हा अत्यंत संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारा क्षण पाहून उपस्थित सर्व नागरिकांचे डोळे पाणावले.
हेही वाचा : 30 वर्षीय गर्भवती महिलेवर भावासह काकाकडून अत्याचार, प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ केले रेकॉर्ड
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक 'पेट ॲनिमल लव्हर्स असोसिएशन'ची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी शेरूच्या आजोबांच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे घरातून बाहेर काढले. शेरूची प्रकृती ठीक असली तरी त्याला सध्या माणसांच्या मायेची आणि सुरक्षित निवाऱ्याची गरज आहे. असोसिएशनच्या वतीने महापालिकेच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली असून सध्या त्याची रवानगी पालिकेच्या शेल्टर होममध्ये करण्यात आली आहे. तिथे त्याची योग्य काळजी घेतली जात असली, तरी त्याला कायमस्वरूपी अशा शेल्टर होममध्ये ठेवणे शक्य नाही. त्यामुळे त्याला एका नव्या कुटुंबाची गरज आहे.
प्राणी मित्र आणि मनपा प्रशासनाकडून आता एका संवेदनशील आणि प्राणीप्रेमी कुटुंबाचा शोध घेतला जात आहे, जे शेरूला दत्तक घेऊन त्याला नवीन आयुष्य देऊ शकतील. तीन दिवस अन्नाविना आणि पाण्याच्या कमतरतेतही त्याने केवळ आपल्या मालकाच्या प्रतीक्षेत घालवले. अशा निष्पाप प्राण्याला आता पुन्हा एकदा प्रेमाची आणि हक्काच्या घराची गरज आहे. आजोबांनी देखील शेरूला प्रेमाने खाऊ घातले आणि त्याचे सांत्वन केले. या संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
ADVERTISEMENT






