Pune Porsche Accident : पुण्यातील चर्चित Pune Porsche Accident प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याचा जामिनावर सुटल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी जंगी पार्टी करताना दिसत असून, दोघांच्या गळ्यात नोटांचे हार घातलेले आहेत. तसेच ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ या गाण्यावर ते नृत्य करत असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी विशाल अग्रवाल यांची जामिनावर सुटका झाली होती. सुटकेनंतर लगेचच हा कथित पार्टीचा व्हिडिओ समोर आल्याने पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. पोर्शे अपघात प्रकरणामुळे आधीच अग्रवाल कुटुंब चर्चेत असताना, आता समोर आलेल्या या व्हिडिओमुळे समाजमाध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत कायद्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि तो जामिनानंतरचाच आहे का, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा पोर्शे अपघात प्रकरण आणि त्यातील आरोपींच्या वर्तणुकीवर चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT




