Pregnant Job : ‘महिलांना प्रेग्नेंट करा अन् पैसे कमवा’; सुखातील जॉबच्या मोहात अडकलात तर…

रोहिणी ठोंबरे

18 Jan 2024 (अपडेटेड: 18 Jan 2024, 10:21 AM)

सध्या सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीच्या असंख्य घटना समोर येत आहेत. नटवरलाल ते सुकेश चंद्रशेखरपर्यंत अनेक गुन्हेगार आले आणि गेले. पण नुकतच समोर आलेलं प्रकरण धक्कादायक आहे. ज्याचा विचार करूनच एखादा व्यक्ती सहज फसू शकतो.

All India Pregnant Job Cyber Fraud in nawada patna bihar gang arrested by police

All India Pregnant Job Cyber Fraud in nawada patna bihar gang arrested by police

follow google news

All India Pregnant Job : सध्या सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) आणि फसवणुकीच्या असंख्य घटना समोर येत आहेत. नटवरलाल ते सुकेश चंद्रशेखरपर्यंत अनेक गुन्हेगार आले आणि गेले. पण नुकतच समोर आलेलं प्रकरण धक्कादायक आहे. ज्याचा विचार करूनच एखादा व्यक्ती सहज फसू शकतो. फसवणुकीच्या या जाळ्यात गुन्हेगारांनी नवीनच घटना बाजारात आणली आहे. (All India Pregnant Job Cyber Fraud in nawada patna bihar gang arrested by police )

हे वाचलं का?

प्रेग्नेंट करा- लाखो कमवा… बाजारात नवीन जॉब ऑफर!

कंपनीचे नाव ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब (All India Pregnant Job) आहे. फसवणुक करणाऱ्या एका मास्टरमाइंडने हे नाव ठेवलं. इच्छुक असल्यास, अर्ज करा. यामध्ये फक्त एवढंच करायचं होतं की, ज्या महिलेला मूल होऊ शकत नाही, तिला प्रेग्नेंट करायचं. असं केल्यास 10 ते 13 लाख रुपये मिळतील आणि तुम्ही ते करू शकला नाहीत तरी किमान 5 लाख रुपये मिळण्याची हमी ही संस्था देत होती. म्हणजे हा जॉब महिलेला प्रेग्नेंट करण्याचा होता.

वाचा : Maratha Reservation: जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावून सांगितलं ‘मुंबईत गोळ्या झेलण्यास…’

ऑफरमध्ये डेडली कॉम्बीनेशन

एकीकडे सुंदर महिलेला फ्रीमध्ये प्रेग्नेंट करणे आणि दुसरीकडे 10 ते 13 लाख रुपये कमवण्याची संधी असं हे डेडली कॉम्बीनेशन होतं. यामुळे अनेकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले. तसंच या डेडली कॉम्बीनेशनमुळे गुन्हेगारांच्या नव्या टोळक्याने करोडो रूपयेही कमावले.

‘ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब’ या फसव्या कंपनीचं जाळं कुठून चालायचं?

बिहारमधील पाटण्यापासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर नवादा हे शहर आहे. या शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर गुरम्हा गाव आहे. प्रेग्नेंट करा आणि लाखो कमवा हा सगळा उद्योग याच गावातून सुरू झाला. हे याचे मुख्यालय होते. जे तोडण्यात आले आहे. कंपनीत कर्मचाऱ्यांच्या नावावर 20 ते 30 वयोगटातील फक्त 20 ते 25 मुलं होती. कंपनीची संपूर्ण उलाढाल या तरुणांकडून व्हायची. हा सर्व खेळ मोबाईलवरूनच चालायचा आणि याची जाहिरात त्यांच्या ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब कंपनीने केली होती.

या संपूर्ण प्रकरणामागील मास्टरमाइंड कोण?

याच गावातील मुन्ना नावाचा मुलगा पाच वर्षांपूर्वी नोकरीसाठी राजस्थानला गेला होता. तिथे त्याने मेवाडमध्ये छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. यावेळी त्याची जामतारासारख्या काही गुंडांशी ओळख झाली. तो या टोळीत सामील झाला. त्यानंतर सायबर फ्रॉडचे प्रशिक्षण घेतले. आता फोनद्वारे कोणालाही लुटण्याची कला त्याने आत्मसात केली होती.

पण हे काम सगळेच करत आहेत असे त्याला वाटले. त्यामुळे काहीतरी नवीन बाजारात आणले पाहिजे या विचाराने तो राजस्थानहून आपल्या गावी परतला. येथे त्याने मत्स्यपालन व्यवसाय करणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. गावाजवळ एक कालवा होता. त्यात त्याने मत्स्यपालन सुरू केले. पण हे त्याचे खरे काम नव्हते.

कालव्याच्या काठावरची एक जुनी मोडकळीस आलेली खोली त्याने साफ केली तिथे कार्यालय उघडले. त्यावर उंच मचान बांधण्यात आली. जेणेकरून जास्त उंचीवर नेटवर्क अधिक चांगले मिळेल. यावेळी त्याने गावातील 20-30 मुलांची निवड केली होती. त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. प्रशिक्षण पूर्ण झाले. कंपनी सुरू करण्याची वेळ आली. सुरूवातील कंपनीबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली. यानंतर कंपनीचे नाव व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर दिसू लागले. याद्वारे ते लोकांचे डेटा विकत घेऊ लागले.

वाचा : बाबासाहेबांचा ‘तो’ इशारा! …म्हणून आंबेडकरांनी नाकारलं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण

जॉब ऑफर देत ठेवल्या ‘या’ अटी…

या ऑफरमध्ये सामील होण्यासाठी, सर्वप्रथम व्यक्तीला त्याचे आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रे द्यावी लागतील, कंपनीकडे नोंदणी करावी लागेल. ज्याची फी पाचशे ते सातशे रुपये होती. हे पैसे जमा केल्यावरच ते मेंबर होऊ शकत होते अशी अट होती. त्यानंतर त्यांना अधिक माहिती दिली जात असे. फ्रीमध्ये प्रेग्नेंट करणं आणि लाखो कमावण्याच्या लालसेपोटी लोक सुरूवातीला पाचशे ते सातशे रुपये देऊन मेंबर होऊ लागले.

यानंतरच खरा खेळ सुरू व्हायचा. नाव आणि पत्ता घेऊन बनावट स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र पाठवले जायचे. त्यानंतर वीर्य चाचणीच्या नावाखाली 1500 ते 2 हजार रुपयांची मागणी केली जायची. ज्याने हे सर्व टप्पे पूर्ण केले, त्याला नंतर सुंदर महिलांचे फोटो पाठवले जायचे. पाच-सहा फोटो पाठवल्यानंतर त्या व्यक्तीला त्यापैकी कोणत्या महिलेला प्रेग्नेंट करायचे आहे याची निवड करण्यास सांगितले जायचे. निवड केल्यानंतर व्यक्तीला त्याच्याच शहरात एखादे पंचतारांकित हॉटेल असल्यास ते त्याच्यासाठी बुक केले जाईल. हॉटेलचा खर्च कंपनी उचलणार आणि ती महिला तिथे पोहोचेल असे सांगितले जात.

शेवटी खेळायचे असा भयानक डाव

या संपूर्ण खेळानंतर समोरची व्यक्ती पूर्णपणे यात गुंतून गेलेली असते. हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी, आणखी एक शेवटची अट पूर्ण करावी लागायची. यावेळी फसवणुक करणारा कंपनीचा प्रतिनिधी समोरच्या व्यक्तीला मेसेज पाठवयचा. जेव्हा आपण बॅंकेत पैसे जमा केल्यावर बॅंकेतून मेसेज येतो हा तसाच मेसेज असायचा. याचा ते फोटो पाठवायचे. हा मेसेज पाठवल्यानंतर प्रतिनिधी समोरच्या व्यक्तीला सांगयचा की, आम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्हाला प्रेग्नेंट करता येण्यापूर्वी 5 लाख रूपये मिळतील, म्हणून आम्ही ही रक्कम तुमच्या खात्यात जमा केली आहे. पण हे पैसे तेव्हाच काढता येतील जेव्हा तुम्ही या रकमेचा जीएसटी भराल.

18% नुसार, 5 लाख रुपयांवर जीएसटीची रक्कम संबंधित व्यक्तीकडून मागितली जाते. यावेळी समोरचा व्यक्ती डेडली कॉम्बीनेशनला बळी पडून 80 ते 90 हजार GST जमा करायला तयार होतो. यानंतर पैसे जमा होताच समोरच्या व्यक्तीचा पुन्हा कॉल येणं बंद होतं. अशा या जाळ्याला कित्येक जण बळी पडले आहेत.

वाचा : नवऱ्याने घेतली बायकोची अग्निपरीक्षा, लग्नाच्या पहिल्याच रात्री अनैसर्गिक…

डेडली कॉम्बीनेशन प्रकरणाचा कसा झाला पर्दाफाश?

गावातील काही लोकांना एवढी मुलं एकत्र बसून फोनवर गप्पा मारताना पाहून विचित्र वाटलं. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यामुळे एक दिवशी पोलीस शांतपणे या ठिकाणी पोहोचले. बाकीचे गोंधळले, पण आठ मुले पकडली गेली. अजून 18 असल्याचं समजलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्या झोपड्या आणि मोडकळीस आलेल्या कार्यालयांची झडती घेतली असता फसवणुकीची ही आश्चर्यकारक घटना समोर आली. हा कोणता नवीन धंदा आहे, याबाबत काही काळ पोलिसही संभ्रमात पडले होते. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

    follow whatsapp