Beed Crime: दगडाने डोके ठेचून हत्या, पाच मामांनी मिळून भाच्याला का संपवलं?

प्रशांत गोमाणे

• 01:48 PM • 09 Dec 2023

8 डिसेंबरला राजेंद्र कळसे त्याच्या मोटार सायकलवरून बाहेर जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडला होता. यावेळी त्याचा पाच मामांसोबत पुन्हा जागेवरून वाद झाला. याच वादातून पाच मामांनी मिळून राजेंद्रच्या डोक्यात दगडाने व लाकडाने मारून त्याची हत्या केली होती. 

beed crime news five uncle killed his nephew land dispute beed news

beed crime news five uncle killed his nephew land dispute beed news

follow google news

Beed Crime News : बीडच्या अंबाजोगाईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भाच्याची (Nephew) हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. राजेंद्र श्रीराम कळसे (वय 37) असे मृत भाच्याचे नाव आहे. राजेंद्रच्या पाच मांमानी मिळूनच त्याची हत्या केली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात पाचही मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एकाला ताब्यात घेतले आहे, तर चौघांचा शोध सुरु आहे. दरम्यान या प्रकरणात पाच मामांनी (Uncle) भाच्याची हत्या का केली? हे जाणून घेऊयात. (beed crime news five uncle killed his nephew land dispute beed news)

हे वाचलं का?

पोलिसांना राजेंद्र कांबळे यांच्या पत्नी आशा कळसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत राजेंद्र याची आई ही अंबाजोगाई येथील आहे. त्याच्या आईला पाच भाऊ आहेत. राम माणिकराव लाड (पवार), लक्ष्मण माणिकराव लाड (पवार), भरत माणिकराव लाड (पवार), बजरंग माणिकराव लाड (पवार), शत्रुघ्न माणिकराव लाड(पवार) अशी या पाच भावांची नावे आहेत.

हे ही वाचा : MLA Disqualification : ‘शिंदेंनी नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून आव्हान दिलं?’, सुनावणीत काय घडलं?

मृत राजेंद्रचा शिवाजी चौकाच्या अलीकडे मेन रोडला वडीलोपार्जीत प्लॉट आहे. या जागेवर बजरंगचे ज्युसबारचे दुकान, रामचे पंक्चरचे दुकान, भरतचे वेल्डींगचे दुकान, शत्रुघ्नचे पंक्चरचे दुकान अशी मिळून चौघांची दुकाने आहेत. तर लक्ष्मणला दुकानासाठी जागा न देता त्या बदल्यात त्याला पाठीमागे असलेली घराची जागा देण्यात आली होती.तो त्याच्या कुटुंबासह राहतो व राम पण त्याच ठिकाणी राहतो. याच वडीलोपार्जित जागेचा हिस्सा मिळावा यासाठी राजेंद्र कळसे गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होता. याच मुद्यावरून राजेंद्रचे त्याच्या मामासोबत वर्षभरापूर्वी वादविवाद होऊन भांडणे देखील झाली होती.

दरम्यान घटनेच्या दिवशी 8 डिसेंबरला राजेंद्र कळसे त्याच्या मोटार सायकलवरून बाहेर जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडला होता. यावेळी त्याचा पाच मामांसोबत पुन्हा जागेवरून वाद झाला. याच वादातून पाच मामांनी मिळून राजेंद्रच्या डोक्यात दगडाने व लाकडाने मारून त्याची हत्या केली होती. या घटनेची माहिती प्रकाश डाके याला मिळताच त्याने राजेंद्रच्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले असता राजेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

हे ही वाचा : ‘माझा भाऊच माझा नवरा’, महिलेने कुटुंबातील गोपनीय गोष्टी केल्या उघड

राजेंद्रच्या कुटुंबियांनी त्याला रिक्षातून अंबाजोगाईतील रूग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. याप्रकरणी पाचही आरोपी मामा विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 302,143,147,158,149,135 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जधावर करत आहेत.

    follow whatsapp