Crime News : बिहारच्या मधुपुरा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चौसा पोलीस ठाणे परिसरात घोषाई पंचायतीच्या अरसंडी गावात शुक्रवारी सकाळी सुनेनं आपल्याच सासूची कथितरित्या हत्या केली. संबंधित प्रकरणातील मृत महिलेची प्रमिला देवी (वय 68) अशी ओळख समोर आली आहे. या घटनेनं गाव पूरता हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जालना जिल्ह्यात भीषण अपघात, कार जळून खाक; गाडीतच अडकला चालक अन्..
सासू आणि सुनेत मोठा वाद
घडलेल्या घटनेनुसार, प्रमिला देवी या सकाळी 8 वाजता घराच्या दारापुढे गवत काढण्याचे काम करत होत्या. याचवेळी, त्यांची सून राजो देवी आणि नवरा तुफानी यादव हे कोणत्यातरी कारणावरून मुलाला शिवीगाळ करत होती. हे ऐकून, सासू प्रमिला देवी यांनी सुनेला मुलासमोरच अपशब्द वापरू नको असे सांगितलं होतं. याच मुद्द्यावरून सासू आणि सुनेत मोठा वाद निर्माण झाला होता.
सुनेनं सासूच्या झिज्या धरून रस्त्यावर आपटलं अन्..
संबंधित प्रकरणात प्रत्यक्षदर्शिच्या म्हणण्यांनुसार, दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, सून राजो देवीने सासू प्रमिला देवीच्या झिंज्या पकडून तिला रस्त्यावर आणून आपटलं. प्रमिला देवी यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र तिच्या सुनेनं गयावया न करता तिचा पाठलाग केला, नंतर तिच्या डोक्यात लाकडी फळीने हल्ला केला. या जखमांमुळे प्रेमिला देवी ही गंभीरपणे बेशुद्ध पडली होती.
घटनेनंतर, स्थानिकांनी जखमी प्रमिला देवी यांना तात्काळ चौसा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तसेच डॉक्टरांनी प्राथमिक तपासातून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच, चौसा पोलीस ठाण्याचे अधिकारी रवी कुमार पासवान आणि एएसआय शैलेंद्र कुमार रंजन पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, त्यांनी मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
हे ही वाचा : अहिल्यानगरात बसची एर्टीगाला धडक, अपघातात कारचा भुगा; 15 जण...
स्टेशन हाऊस ऑफिसर रवी कुमार पासवान यांनी सांगितलं की, या घटनेप्रकरणी महिलेला ताब्यात घेण्यात आलं. एफएसएलच्या पथकाला पाचारण करण्यात आले. कुटुंबीयांकडून तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरणाची पुढील कारवाई केली जाणार आहे. याच घटनेनंतर गावात शोक पसरला आहे. या घटनेनं गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT











