धड शेतात अन् मुंडकं नदीत, नवऱ्याला संपवताना बायको बघत बसली; नेमकं कारण काय?

मुंबई तक

• 12:35 PM • 04 Jun 2026

एका सावत्र मुलाने आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीने वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

धड शेतात अन् मुंडकं नदीत

point

नवऱ्याला संपवताना बायको बघत बसली

point

नेमकं कारण काय?

Crime News : एका सावत्र मुलाने आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीने वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चकमकीदरम्यान मुख्य आरोपीला अटक केली असून, आता मृतदेहाच्या छिन्नविच्छिन्न केलेल्या डोक्याचा शोध सुरू केला आहे. मालमत्ता हडपण्याच्या भीतीने आणि लोभापोटी सावत्र मुलाने आपल्याच कुटुंबातील सदस्यांसह मिळून हत्येचा हा कट रचला होता. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

पोलिसांना करावे लागले फायरिंग

सिखेडा पोलीस आणि 'एसओजी' (SOG) पथकाने बुधवारी (3 जून) रात्री भोपा रोडजवळील असदनगर भंडूर मार्गावर नाकेबंदी केली होती. यादरम्यान एका संशयास्पद काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीला थांबण्याचा इशारा केला असता, आरोपींनी गाडी कच्च्या रस्त्याने पळवण्याचा प्रयत्न केला. स्वतःला पोलिसांच्या वेढ्यात अडकल्याचे पाहून आरोपींनी थेट पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या गोळीबारात मुख्य आरोपी आणि सावत्र मुलगा बादल याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या, ज्यामुळे तो जखमी होऊन खाली पडला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

हे ही वाचा : कोल्हापूर : प्रियकराने व्हिडीओ काढले, अन् लॉज, झाडी, कारमध्ये चौघांनी अब्रू लुटली

अंधारात आई फरार

या चकमकीचा आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गाडीत बसलेली आरोपीची आई रेणू ही घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाली. पोलीस सध्या जंगलात आणि संभाव्य ठिकाणांवर कॉम्बिंग ऑपरेशन राबवून तिचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी बादल याच्याकडून पोलिसांनी एक 315 बोअरचे गावठी पिस्तूल, जिवंत व वापरलेली काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कार आणि एक बॅग जप्त केली आहे. या बॅगेत मृताचे कपडे आणि काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत.

हे ही वाचा : बीड : 20 वर्षीय पूजाने आयुष्याचा दोर कापला, असं घडलं तरी काय?

धड शेतात, शीर नदीत

पोलीस चौकशीत समोर आले आहे की, आरोपी बादल आपल्या सावत्र वडिलांचा तिरस्कार करायचा. तसेच वडील आपली सर्व कौटुंबिक मालमत्ता हडप करतील अशी त्याला भीती होती. याच कारणावरून त्याने आई, पत्नी आणि दोन मित्रांसह मिळून रॉकीचे अपहरण करून त्यांची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी धड शेतात गाडले आणि शीर कापून गंगानदीच्या कालव्यात फेकून दिले. पोलिसांनी यापूर्वीच दुसरा आरोपी मोंटी त्यागी याच्या माहितीवरून धड जप्त केले होते, तर आता बादलच्या अटकेनंतर पोलीस गंगानदीच्या कालव्यात टॉर्चच्या प्रकाशात मृताच्या शिराचा शोध घेत आहेत.