कोल्हापूर : प्रियकराने व्हिडीओ काढले, अन् लॉज, झाडी, कारमध्ये चौघांनी अब्रू लुटली
kolhapur crime news : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 19 वर्षीय तरुणीचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चार जणांनी तब्बल 8 महिने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोल्हापूर : प्रियकराने व्हिडीओ काढले,
अन् लॉज, झाडी, कारमध्ये चौघांनी अब्रू लुटली
kolhapur crime news : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather Update : मान्सूनचा वेग वाढला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत धडकणार?
आदित्य शेटके याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
या प्रकरणात मुख्य आरोपी आदित्य शेटके याने ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने तरुणीशी ओळख वाढवली. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधांमध्ये रूपांतर झाले. मात्र या नात्याच्या आडून तरुणीचा गैरफायदा घेण्याचा कट रचला गेला. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तिला बोलावून घेतल्यानंतर तिच्यासोबत शारीरिक जवळीक साधण्यात आली आणि त्याचवेळी तिचे काही आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढण्यात आल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : चार निष्पाप मुलांच्या समोर आई रक्ताच्या थारोळ्यात, अन् भयंकर घडलं!









