Crime News : पोलीस हवालदाराने लग्नाचे आमिष दाखवून महिला सहकाऱ्याचे तब्बल 10 वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी हवालदारावर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीसह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील बस्ती येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अडीच महिन्यांनंतर 12 वर्षीय मुलाचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला, मृत्यूचं खरं कारण काय?
मैत्रीचे प्रेमात रुपांतर
पीडिता जिल्हा पोलीस विभागात नोकरी करते, तिचा आरोप असा की, तिची संबंधित कॉन्स्टेबलशी सुमारे दहा वर्षांपूर्वी ओळख झाली होती. हळू हळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. तिनं दावा केला की, आरोपीनेतिला एका मंदिरात नेऊन भांगेत कुंकू भरून तिच्याशी विवाह करण्याचे वचन दिले. यावर विश्वास ठेवून ती गेल्या 10 वर्षांपासून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होती.
लग्न करण्यास नकार
त्याने तिच्याशी लग्न करण्यास किंवा तिच्यासोबत राहण्यास स्पष्टपणे नकार दिला, तिला कॉन्स्टेबल आणि त्याच्या कुटुंबीयांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. पीडितेच्या माहितीनुसार, जेव्हा ती आरोपीशी लग्नाबाबत बोलायची तेव्हा तो नेहमी काहीतरी निमित्त सांगून टाळाटाळ करायचा. काही काळापासून, आरोपीने तिच्याशी विवाह करण्यास स्पष्टपणे नकार दिला, तिच्यापासून दूर राहण्यास सुरूवात केली.
फसणवूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार दाखल केली. एसएचओ मोती चंद यांनी सांगितलं की, तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी कॉन्स्टेबल मुकेश कुमार, भाऊ अखिलेश, सुर्वेश आणि वडील डॉ. राजमन यांच्याविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून पुराव्याच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा : जुन्नर: पोटच्या लेकानं बापासह सख्ख्या भावाला दगडाने ठेचून संपवलं, मृतदेहाशेजारी रात्रभर...
दोन्ही गट हे पोलीस दलात सक्रिय असल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस आरोपी कॉन्स्टेबलच्या अटकेबाबत कोणतेही अधिकृत विधान करण्यास टाळाटाळ करत आहेत.
ADVERTISEMENT











