Crime News : आईने आपल्या निष्पाप पाच वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली. संबंधित प्रकरणातील कटात आई आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच मुलीची हत्या केली, या घटनेनं परिसरा हदरून गेल्याची माहिती समोर आली. संबंधित प्रकरण हे तेलंगाणातील कामोरेड्डीच्या श्रीरामनगर कॉलनीत आहे. या घटनेनं धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कल्याण : कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
आरोपी नरसिम्लू सहा महिन्यांपासून महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नरसिम्लू हा गेल्या सहा महिन्यांपासून महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. ती महिला तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि तिला दोन मुले देखील होती. मात्र, आपला मुलगा दोघांच्या नात्यात मोठा अडथळा ठरू शकतो, अशी भीती महिलेला वाटू लागली होती.
ते मूल मतिमंद होते ही वस्तुस्थिती आरोपी आणि आईसाठी चिंतेची बाब बनली होती. हळूहळू, त्या निष्पाप मुलाला संपवण्याचा कट रचला होता. आपले नातेसंबंध राहावे यासाठी, त्यांनी माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. संबंधित प्रकरणात घटनेच्या दिवशी पीडितेची आई घरी नव्हती, तेव्हा निरसिम्लू दारू पिऊन घटनास्थळी आला. निष्पाप बाळ घरात एकटे होते, मात्र रचलेल्या कटाबाबत काहीही कल्पना नव्हती.
मुलाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सर्वप्रथम मुलाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. या अचानक झालेल्या हल्ल्याने मुलगा प्रचंड घाबरून गेला होता, तो व्हिवळू लागला तिथे कोणीही त्याला वाचवण्यासाठी आले नाही. आरोपीने मुलाच्या डोक्यावर काठीने हल्ला केला. काही क्षणभरात मुलीचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नगर सर्कल इन्स्पेक्टर नरहरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरु केला. सुरुवातीला संशय आई आणि तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर होता. या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले.
हे ही वाचा : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला 7 हजार आंब्यांचा महानैवेद्य, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून 'आंबा महोत्सव'
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाने अनेक प्रश्न आता समोर आले आहेत. एखादी आई आपल्याच मुलाशी इतकी क्रूरपणे वागू शकते? आई-वडील आपल्या मुलांना आपल्याच मार्गातील अडथळे मानू लागलेत का? असा प्रश्न निर्माण होतोय. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











