सासू, जावई अन् मुलीमध्ये 'त्या' गोष्टीवरुन वाद, सहा महिन्यांच्या बाळाला गच्चीवरुन फेकले खाली

एका निर्दयी बापाने आपल्या सहा महिन्यांच्या पोटच्या मुलाला घराच्या गच्चीवरुन खाली फेकून दिले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून आनंदाने न्हाऊन निघालेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:21 PM • 19 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सासू, जावई अन् मुलीमध्ये 'त्या' गोष्टीवरुन वाद

point

सहा महिन्यांच्या बाळाला गच्चीवरुन फेकले खाली

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादाच्या भरात एका निर्दयी बापाने आपल्या सहा महिन्यांच्या पोटच्या मुलाला घराच्या गच्चीवरुन खाली फेकून दिले. उत्तर प्रदेशाचील संभल जिल्ह्यातील ही घटना आहे. कुमकुम आपल्या भावाच्या लग्नासाठी माहेरी मलखानपूर येथे आली होती. तिचा भाऊ सौरभ याचे रविवारी लग्न असल्याने संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते, मात्र या एका घटनेने लग्नाच्या घराचे रूपांतर स्मशानशांततेत झाले आहे.

हे वाचलं का?

सासूच्या हातातून बाळाला हिसकावले

मिळालेल्या माहितीनुसार, कुमकुमचा पती बाबी हा देखील या लग्नासाठी सासरवाडीला आला होता. शनिवारी (18 एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास बाबी दारूच्या नशेत होता आणि त्याचे पत्नीशी कोणत्यातरी कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला गेलेला पाहून कुमकुमची आई सुनीता या सहा महिन्यांच्या नातवाला, राघवला कडेवर घेऊन तिथे मध्यस्थी करण्यासाठी पोहोचल्या. मात्र, रागाच्या भरात असलेल्या बाबीने सासूच्या हातातील चिमुरड्याला हिसकावून घेतले आणि थेट छतावरून खाली रस्त्यावर फेकून दिले.

हे ही वाचा : तरुणीसोबत वृद्ध नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ, काँग्रेस-भाजपमध्ये चांगलीच जुंपली

सिमेंटच्या रस्त्यावर आदळला राघव

सहा महिन्यांचा राघव डोक्याच्या बाजूने थेट सिमेंटच्या रस्त्यावर आदळल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून आनंदाने न्हाऊन निघालेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी पित्याचे हे क्रूर कृत्य पाहून संपूर्ण गावाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : आई आहे की कसाई? अनैतिक संबंधात अडथळा, पोटच्या दिव्यांग मुलाला डोळ्यात चटणी टाकून संपवलं

पोलीस तपास काय सांगतो?

याप्रकरणी पोलीस निरीक्षक कमलेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, पती-पत्नीमधील वैयक्तिक वादातून ही घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पित्याने आपल्याच मुलाचा जीव घेतला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अद्याप कुटुंबाकडून कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही, मात्र पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.