Crime News : एका 20 वर्षीय गर्भवती महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुनितादेवी असे मृत महिलेचे नाव असून, ती तीन महिन्यांची गर्भवती होती. या घटनेनंतर पुनिताच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सासरच्यांनी तिला बेदम मारहाण करून तिची हत्या केली आणि हा प्रकार आत्महत्या वाटावा यासाठी तिचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत लटकवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा दावा माहेरच्यांनी केला आहे. झारखंडच्या पलामू परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
वर्षभरापूर्वी विवाह
मृत महिलेचे वडील दीपक मेहता आणि आई वेदवंती देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनिताचा विवाह वर्षभरापूर्वी अंजन मेहता याच्याशी झाला होता. दोन महिन्यांपूर्वी सासूशी झालेल्या वादातून पतीने तिला मारहाण करून माहेरी सोडले होते, मात्र 15 दिवसांनंतर तो तिला पुन्हा घेऊन गेला. अलीकडेच सोमवारी (13 एप्रिल) माहेरी असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमाला पतीने तिला नेले नाही, यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. याच रागातून सोमवारी संध्याकाळी पुनिताने जेवण बनवले नव्हते, ज्याची तक्रार सासरच्यांनी फोन करून माहेरच्यांकडे केली होती.
हे ही वाचा : व्याही आणि विहीणबाई पडले प्रेमात, दीराने नवऱ्याची हत्या केल्याचा स्मार्ट बनाव, पण एका चुकीने सगळं उलगडलं
जेवणावरुन वाद अन् हत्या
मंगळवारी माहेरच्यांनी समजावल्यानंतर पुनिताने जेवण बनवले, मात्र सासरच्या कोणाही सदस्याने ते जेवण केले नाही. याच कारणावरून मंगळवारी संध्याकाळी पुन्हा वाद उफाळून आला. माहेरच्यांचा आरोप आहे की, याच वादातून पतीने तिला बेदम मारहाण केली ज्यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, सासरच्या मंडळींनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगत तिला तातडीने गढवा सदर रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. विशेष म्हणजे, पुनिताचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचताच सासरचे सर्व लोक मृतदेह तिथेच सोडून पसार झाले.
हे ही वाचा : अमरावती सेक्स स्कँडल : भाड्याने घेतलेला फ्लॅट ते कॅफे...'डर्टी खेळ', 400 रुपयांत मिळायची 'प्रायव्हेट जागा'
ऐन तारुण्यात मुलीचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच गढवा पोलीस ठाण्याने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असल्याचेही बोलले जात आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. दुसरीकडे, ऐन तारुण्यात मुलीचा असा संशयास्पद मृत्यू झाल्याने माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी याप्रकरणी न्यायाची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT











