प्रेम, लग्न आणि सर्व्हिस रिव्हॉल्वरने खून... पत्नीच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

Crime News : पोलीस उपनिरिक्षक चंदन कुमार यांच्या पत्नी मधूच्या हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. शनिवारी एका घरात सर्व्हिस रिवॉल्वरमधून गोळी सुटली आणि ती पत्नी मधूला लागल्याने तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात होता, परंतु कुटुंबियांनी ही हत्या असल्याचा दावा करत चंदन कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले.  

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:00 AM • 18 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

 चंदन कुमार आणि मधूचे शाळेपासून प्रेमसंबंध

point

सर्व्हिस रिव्हॉल्वरने पत्नीवर गोळीबार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Crime News : पोलीस उपनिरिक्षक चंदन कुमार यांच्या पत्नी मधूच्या हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. शनिवारी एका घरात सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली आणि ती पत्नी मधूला लागल्याने तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात होता, परंतु कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचा दावा करत चंदन कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'माझी नाहीस तर कोणाचीच नाहीस', तरुणीने लग्नास दिला नकार, तरुणाने पीडितेला HIV चं इंजेक्शन दिलं, पुढे भयंकर...

पोलिसांनी तीन डॉक्टर पथकाच्या देखरेखीखाली शवविच्छेदन केले आणि नंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मृताचे कुटुंब समस्तीपूर जिल्ह्यातील विधान पोलीस ठाणे परिसरातील असून, आरोपी चंदन कुमार हा बोतिया येथील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी मधूवर मुंगेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. मयत व्यक्तीचे वडील रणजीत कुमार यांच्या जबाबाच्या आधारे सफिया सराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत उपनिरिक्षक चंदन कुमारच्या मुसक्या आवळून त्याला तुरुंगात पाठवले.

 चंदन कुमार आणि मधूचे शाळेपासून प्रेमसंबंध

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यांनुसार, चंदन कुमार आणि मधूचे शाळेपासून प्रेमसंबंध होते. मधूने केलेल्या सततच्या मनधरणीनंतर लग्नाला संमती दिली. लग्नानंतर कळाले की, चंदन कुमारचे एका महिला उपनिरीक्षकाशी प्रेमसंबंध होते, यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागला. मधूने चंदनला त्या महिलेपासून दूर राहण्याचा सतत आग्रह केला, ज्यामुळे दोघांमधील संघर्ष आणखी पेटला. 

काहीच महिन्यांपूर्वी महिला उपनिरीक्षकांची दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदली झाली, तर चंदनची बरियारपूरहून सफिया सराई पोलीस ठाण्यात बदली झाली होती. सुमारे तीन महिन्यापूर्वी मधू तिच्या माहेरून सफिया सराई येथे परत आली होती आणि घटनेच्या दहा दिवसांपूर्वी आधी ती घरी जाऊन परत आली होती. 

हे ही वाचा : दीड वर्षे शरीसंबंध, नंतर 3 वेळा गर्भपात, लग्नाचे आमिष दाखवून बिल्डरच्या मुलावर बलात्काराचा आरोप

सर्व्हिस रिव्हॉल्वरने पत्नीवर गोळीबार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

कुटुंबाच्या आरोपानुसार, घटनेच्या दिवशी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता, नंतर सायंकाळी उशिरा गोळीबाराची घटना घडली होती. महिला उपनिरीक्षकाशी असलेल्या संबंधामुळे चंदनने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने पत्नीवर गोळीबार करून तिची हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. मयत मुलीचे वडील आणि इतर कुटुंबीयांनी पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या मते, हे हुंडाबळीचे प्रकरण असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे.