Pahalgam Attack: 'मी झिपलाइनवर होतो आणि खाली...', पहलगाम हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीचा Video आणि सांगितलेली घटना जशीच्या तशी..

Pahalgam Terror Attack:पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक नवा आणि भयंकर असा व्हिडिओ समोर आला आहे. तसंच या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने देखील नवी माहिती सांगितली आहे.

पहलगाम हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीचा Video

पहलगाम हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीचा Video

मुंबई तक

29 Apr 2025 (अपडेटेड: 29 Apr 2025, 10:22 AM)

follow google news

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 6 दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना झिपलाइनवर बसवलेल्या एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रत्यक्षदर्शी ऋषीने 'आज तक'ला सांगितले की खाली गोळ्या कशा झाडल्या जात होत्या आणि 20 सेकंदांनंतर त्याला हल्ला झाला असल्याचं समजलं. त्यांच्या मते, सुमारे पाच दहशतवादी लष्कराच्या गणवेशात होते, त्यांचे चेहरे झाकलेले होते आणि ते लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालत होते. ऋषी म्हणाला की तो स्वतः थोडक्यात बचावला. 

हे वाचलं का?

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. यावेळी या घटनेचा साक्षीदार असलेल्या ऋषीने आज तकशी बोलताना नेमकी घटना कशी घडली आणि त्यावेळी तिथे काय घडत होतं याविषयी माहिती दिली आहे. 

गोळीबार सुरू असताना झिपलाइनवर असलेल्या ऋषीने सांगितलेली कहाणी जशीच्या तशी...

प्रश्न 1: तुम्हाला कल्पना होती का की काहीतरी चुकीचं घडणार आहे?

उत्तर: नाही, मला कल्पना नव्हती. मी मजा करत होतो, व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. सुरुवातीला सगळं ठीक होतं, नंतर अचानक गोळीबार सुरू झाला.

प्रश्न 2: गोळीबार कधी सुरू झाला आणि तुम्हाला कधी कळले?

उत्तर: दुपारी 2.30 च्या सुमारास गोळीबार सुरू झाला. सुमारे 20 सेकंदांनंतर मला कळले की दहशतवादी हल्ला झाला आहे.

प्रश्न 3: गोळीबार सुरू झाल्याचं तुम्ही कसं पाहिलं आणि त्या क्षणी तुम्हाला काय वाटलं?

उत्तर: जेव्हा मी खाली पोहोचलो तेव्हा मला दिसले की माझ्या पत्नीसमोर दोन जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. पुढचे लक्ष्य मी होतो, पण दोन तरूण आल्याने मी वाचलो.

हे ही वाचा>> "तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता...", कुडाळच्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव

प्रश्न 4: तुम्ही किती दहशतवादी पाहिले आणि त्यांच्या कारवाया कशा होत्या?

उत्तर: मी पाहिले की मैदानावर दोन लोक होते जे धर्माबद्दल विचारल्यानंतर गोळीबार करत होते. तर झुडपांमधूनही गोळीबार होत होता. माझ्या मते 4-5 दहशतवादी होते.

प्रश्न 5: दहशतवाद्यांनी त्यांचे चेहरे झाकले होते का आणि त्यांनी काय घातले होते?

उत्तर: हो, त्यांनी चेहरा झाकला होता आणि ते भारतीय सैन्याच्या गणवेशात आले होते.

 

पाहा हल्ल्याचा नवा VIDEO

 

प्रश्न 6: तिथे काही घोषणाबाजी चालू होती का?

उत्तर: नाही, घोषणाबाजी झाली नाही. दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने सर्वजण पळून जात होते.

प्रश्न 7: गोळीबार झाला तेव्हा तुम्ही कुठे लपला होता आणि तुम्ही कसे वाचलात?

उत्तर: मी आणि माझे कुटुंब अशा ठिकाणी लपलो जिथून आम्ही कुणाला सहज दिसत नव्हतो. तिथे आधीच आणखी दोन-तीन लोक होते. आम्ही सुमारे 8-10 मिनिटे लपून राहिलो आणि नंतर झिगझॅग पद्धतीने धावू लागलो.

प्रश्न 8: तुमच्या समोर किती लोक मरण पावले?

उत्तर: आमच्या समोर सुमारे 17-18 लोकांचा मृत्यू झाला.

प्रश्न 9: झिपलाइनिंग करताना तुम्हाला काही संशयास्पद वर्तन दिसले का?

हे ही वाचा>> Pahalgam Attack: गॅसने भरलेले 20-25 सिलेंडर का दिले फेकून? दहशतवादी हल्ल्यातील भयंकर गोष्ट आली समोर

उत्तर: हो, झिपलाइन करणारा माणूस सुरुवातीला सामान्य होता पण खाली गोळीबार सुरू होताच त्याने 'अल्लाह हू अकबर' अशा घोषणा दिल्या. मला शंका आहे की तो देखील यात सामील असावा.

प्रश्न 10: सुरक्षा दलांना पोहोचण्यासाठी किती वेळ लागला?

उत्तर: भारतीय सैन्य सुमारे 22 मिनिटांत पोहोचले आणि सर्व पर्यटकांना कव्हर केले.

प्रश्न 11: जेव्हा सैनिक आले तेव्हा लोक घाबरले होते का?

उत्तर: हो, जेव्हा खरे लष्करी सैनिक आले तेव्हा महिला घाबरल्या कारण दहशतवादी देखील लष्करी गणवेशात होते. मग सैन्याने त्यांना खात्री पटवून दिली की तेच खरे सैन्य आहेत.

प्रश्न 12: दहशतवाद्यांनी पर्यटकांचे फोनही हिसकावले का?

उत्तर: मला याबद्दल माहिती नाही. मला ते दिसले नाही. आम्ही फक्त धावत होतो. पण दहशतवादी धर्म विचारून गोळीबार करत होते हे निश्चितच दिसून आले.

प्रश्न 13: दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांचे कपडे चोरले का?

उत्तर: हो, असे दिसते की त्यांनी सुरक्षा रक्षकांना मारले, त्यांचे कपडे चोरले आणि ते घालून आत घुसले.

    follow whatsapp