Pahalgam Attack: गॅसने भरलेले 20-25 सिलेंडर का दिले फेकून? दहशतवादी हल्ल्यातील भयंकर गोष्ट आली समोर
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तिथे नजीकच असणाऱ्या छोट्या हॉटेलांमधील जवळजवळ 20 ते 25 गॅस सिलेंडर हे झुडपात फेकून देण्यात आले. हे नेमकं कोणी आणि का केलं ते आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

पहलगाम: पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याचवेळी तेथील छोट्या हॉटेलांमध्ये असणारे 20 ते 25 गॅस सिलेंडर हे मागच्या झाडीत फेकून दिल्याचं समोर आलं आहे. आता हे सिलेंडर नेमके कोणी आणि का फेकून दिले असा सवाल विचारला जात आहे. त्याचविषयी आम्ही आपल्याला नेमकी माहिती देत आहोत.
नेमकी घटना काय?
पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये जेव्हा गोळीबार झाला तेव्हा तेथील छोट्या-छोट्या हॉटेलमध्ये बराच गोंधळ उडाला. बैसरन व्हॅलीच्या विस्तीर्ण मैदानाला लागूनच स्थानिकांनी काही हॉटेल सुरू केले आहेत. याच हॉटेलमध्ये पर्यटकांना चहा, नाश्ता आणि इतर काही खाण्याचे पदार्थ उपलब्ध असतात. हा संपूर्ण भाग अत्यंत दुर्गम आहे. कारण इथे जाण्यासाठी अद्यापही कोणते रस्ते किंवा दळणवळणाची महत्त्वाची साधनं उपलब्ध नाहीत. बैसरन व्हॅली हा संपूर्ण भाग खूपच सुंदर आणि विविधतेने नटलेला आहे. पण पहलगाम शहरातून तिथे जाण्यासाठी चालत किंवा घोड्यावरूनच जाता येतं.
हे ही वाचा>> Pahalgam Attack: जखमींना पाठीवर घेऊन धावत सुटला..., प्रचंड चर्चेत असलेला सजाद भट्ट आहे तरी कोण?
मात्र, असं असलं तरी बैसरन व्हॅली हे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जात असल्याने ते पाहण्यासाठी इथे नेहमी हजारो पर्यटक येतात. त्यामुळेच इथे असणाऱ्या छोट्या-छोट्या हॉटेलांमध्येही बरीच गर्दी असते. जिथे पर्यटक हे चहा, कॉफी, भेळ, मॅगी यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेतात.
हॉटेलांमधील गॅस सिलेंडर का फेकून देण्यात आले?
दरम्यान, 22 एप्रिल 2025 रोजी जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा येथील हॉटेलांमध्ये बरेच पर्यटक होते. गोळीबाराचा आवाज ऐकून या पर्यटकांमध्ये एकच घबराट पसरली. तर दुसरीकडे हॉटेल मालक देखील भयभीत झाले. दहशतवादी हे ज्या पद्धतीने गोळीबार करत होते. ते पाहून स्थानिक नागरीक आणि हॉटेल मालक देखील जागीच थिजून गेले होते.










