पतीने मित्रासोबत मिळून रचला भयानक कट, पत्नीसोबत नको ते करून बसला!
संबंधित घटना सुरुवातीला आत्महत्या असल्याचं समोर आलं आणि अनैसर्गिक मृत्यू म्हणून दाखल करण्यात आलं. आता, या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि त्याच्या मित्राला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीने मित्रासोबत मिळून रचला भयानक कट
पत्नीची निर्घृण हत्या अन् नंतर आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न...
नेमकं प्रकरण काय?
Crime News: कर्नाटकच्या बंगळुरू येथून हत्येचं खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. बेंगळुरूच्या राजराजेश्वरीनगर परिसरात एका महिलेचा संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता हे प्रकरण भयानक हत्येच्या कटात रूपांतरित झालं आहे. ही घटना सुरुवातीला आत्महत्या असल्याचं समोर आलं आणि अनैसर्गिक मृत्यू म्हणून दाखल करण्यात आलं. आता, या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि त्याच्या मित्राला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव आशा असून 10 जानेवारी रोजी तिच्याच घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. त्यानंतर, आशाचा भाऊ अरुण कुमार याने यासंबंधी तक्रार दाखल केली. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आशाने जवळपास सहा महिन्यांपूर्वी वीरुपाक्ष नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता आणि मागील दीड वर्षांपासून दोघे पती-पत्नी राजराजेश्वरीनगर येथे राहत होते.
दीड महिन्यापासून दोघे वेगळे राहत होते...
कुटुंबियांच्या आरोपानुसार, लग्नाच्या झाल्यानंतर सुरूवातीच्या दिवसापासूनच तिचा पती विरुपाक्ष आशाकडे दुर्लक्ष करत होता. इतकेच नव्हे तर तो नियमित काम सुद्धा करत नव्हता आणि पत्नीच्या कमाईवर अवलंबून होता. त्यानंतर, त्याच्या विवाहबाह्य संबंधावरून देखील जोडप्यामध्ये वाद वाढत गेले. कालांतराने त्यांच्या नात्यात इतका दुरावा निर्माण झाला की मागील दीड महिन्यापासून ते वेगळे राहत होते आणि त्यांच्या घटस्फोटाचा खटला कुटुंब न्यायालयात प्रलंबित होता.
हे ही वाचा: वजन कमी करण्यासाठी यूट्यूब व्हिडीओ पाहून 'तो' पदार्थ खाल्ला, रात्रीतून जीव गेला...
पोलिसांनी दिली माहिती
10 जानेवारी रोजी आशाच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी यूडीआर नोंदवून तपास सुरू केला. त्यानंतर, 11 जानेवारी रोजी व्हिक्टोरिया हॉस्पिटलमधील पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यूबद्दल गंभीर शंका व्यक्त केल्या आणि पोलिसांना सविस्तर अहवाल सादर केला तेव्हा या कथेला एक वेगळं वळण मिळालं. पोलिसांनी तपासाचा विस्तार केला आणि 14 जानेवारी रोजी आशाचा पती विरुपाक्ष तसेच एका मित्राला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्हा कबूल केल्याचं वृत्त आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आशाच्या पतीने आधी तिचा गळा दाबून खून केला आणि नंतर ती आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी तिला पंख्याला लटकवलं.










