8, 6 आणि 5 वर्षांच्या तीन चिमुकल्या मुलींना पाण्यात बुडवून मारलं, बापाने लेकींना का संपवलं?
crime news : वडिलांनी आपल्याच पोटच्या तीन अल्पवयीन मुलींची निर्घृण हत्या केली. रविवारी पोलिसांनी आरोपी ऑटो-रिक्षा चालकाला अटक केली होती. त्याने आपल्या मुलींना तलावात बुडवून मारल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याची महिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आरोपी ऑटोचालक ड्रग्ज व्यसनी
तिन्ही मुलींना तलावात नेले आणि एक-एक करून तलावात फेकले
Crime News : तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी आपल्याच पोटच्या तीन अल्पवयीन मुलींची निर्घृण हत्या केली. रविवारी पोलिसांनी आरोपी ऑटो-रिक्षा चालकाला अटक केली होती. त्याने आपल्या मुलींना तलावात बुडवून मारल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : गुरु ग्रहाच्या थेट हालचालीमुळे धनाचा वर्षाव होईल, तर 'या' राशींचे नशीब बदलेल
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आरोपीने पळून जाण्याचे नियोजन केले होते. 6 मार्च रोजी आरोपी ऑटो चालक आणि त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली, त्याच्या 8, 6 आणि 5 वर्षांच्या तीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केल्यानंतर शोध सुरु करण्यात आला. मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक रहिवाशांची चौकशी केली आणि मुलींचे फोटो सोशल मिडिया आणि मेसेंजिग अॅपवर शेअर केले होते.
तपासादरम्यान, पोलिसांनी वडिलांचे कडक चौकशी केली असता, मुलींना शेवटच्या क्षणी कुठे पाहिले याची मागणी केली होती, तो त्याच्या बोलण्यावर ठाम नव्हता. पोलिसांना त्याच्या हालचालींवर संशय आला आणि तांत्रिक तपासणी आणि कठोर चौकशीनंतर त्याने गुन्हा कबूल केला.
आरोपी ऑटोचालक ड्रग्ज व्यसनी
चौकशीदरम्यान, आरोपी हा ऑटोचालक ड्रग्ज व्यसनी असून आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे उघड झाले. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या तीन मुलींचे पालनपोषण करणे कठीण होत चालले होते, म्हणून त्याने त्यांना मारण्याचा निर्णय घेतला होता.










