Maharashtra Weather : अर्णब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम? IMD चा अलर्ट काय?
Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागांत पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान समुद्रात (Andaman Sea) नव्या हवामान प्रणालीची निर्मिती झाली आहे. मुंबईत 30 ऑक्टोबर रोजी याच अर्णब चक्रीवादळामुळे सकाळी पावसाने हजेरी लावली होती, आता तशीच परिस्थिती इतर राज्यात जाणवेल. 31 ऑक्टोबर रोजी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, कोकणात काही भागांसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अर्णब चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागांत पावसाचे वातावरण
31 ऑक्टोबर रोजी वर्तवलेल्या हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागांत पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान समुद्रात (Andaman Sea) नव्या हवामान प्रणालीची निर्मिती झाली आहे. मुंबईत 30 ऑक्टोबर रोजी याच अर्णब चक्रीवादळामुळे सकाळी पावसाने हजेरी लावली होती, आता तशीच परिस्थिती इतर राज्यात जाणवेल. 31 ऑक्टोबर रोजी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, कोकणात काही भागांसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भात बहुतांश जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा : वाशिम: 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, दुकानदारानं केलं गर्भवती
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवलेली नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांची हवामानाच्या दृष्टीने वेगवेगळी स्थिती आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अधिकचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता नाही. नाशिक जिल्ह्यासह नाशिक घाटमाथा परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत 31 ऑक्टोबर रोजी मेघगर्सनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत पावसाचे वातावरण कायम राहण्याची अधिक शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांना पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : नांदेडमध्ये नातेवाईकांचा वाद, भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला संपवलं; 12 जण अटकेत
विदर्भ
विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना कोणताही हवामानाचा इशारा देण्यात आलेला नाही. तसेच पावसाची उघडझाप राहण्याचा अंदाज आहे.
