लंडनला शिकायला गेली, पण पुण्यात फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह; तरुणीसोबत काय घडलं?

मुग्धा देशमुख जुलै 2025 मध्ये एमबीए (MBA) करण्यासाठी युकेला (UK) गेली होती, परंतु ऑगस्ट महिन्यात ती गुपचूप भारतात परतली. पुण्यातील एका अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह सापडला. तिच्यासोबत नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लंडनला शिक्षणासाठी गेली तरुणी

point

मात्र पुण्यात फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

Pune Crime : पुण्यात राहणाऱ्या एका 34 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुग्धा देशमुख असे या मृत महिलेचे नाव असून ती लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असल्याचे तिच्या कुटुंबीयांना वाटत होते. मात्र, झोमॅटो आणि इतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सवर झालेल्या आर्थिक व्यवहारांमुळे ती ब्रिटनमधून भारतात परतल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.

2025 मध्ये शिक्षणासाठी लंडनला

पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे परिसरातील लोढा बेलमोंडो गृहप्रकल्पातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये गुरुवारी (29 ऑक्टोबर) मुग्धाचा मृतदेह आढळून आला. मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेली मुग्धा जुलै 2025 मध्ये शिक्षणासाठी लंडनला गेली होती, परंतु ऑगस्ट महिन्यातच ती गुप्तपणे भारतात परतली होती. विशेष म्हणजे तिने एप्रिल महिन्यातच हा फ्लॅट भाड्याने घेतला होता, मात्र लंडनहून परतल्यानंतरच ती तेथे राहू लागली होती.

हे ही वाचा : कराळे मास्तर, रविराज साबळेंनी प्रस्थापितांची गणितं कशी बिघडवली?

बँक स्टेटमेंटमुळे प्रकार उजेडात

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कुटुंबीयांचा तिच्याशी संपर्क तुटल्याने तिच्या वडिलांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. लंडनमधील तिच्या मैत्रिणीने तिथे मिसिंग तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, मुग्धा ऑगस्टमध्येच ब्रिटन सोडून गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तिच्या वडिलांनी बँक स्टेटमेंट तपासले असता 8 ते 25 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे व्यवहार झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे ती भारतात असल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा : नोकरीच्या नावाखाली करायचा फोन, 78 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश

छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे तिचे लोकेशन गहुंजे येथे ट्रेस केले. पोलिसांना कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता मुग्धा मृत अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमांच्या खुणा नसून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी तिच्या अवयवांचे नमुने जतन करण्यात आले आहेत. याप्रकरणी  पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.