जावयाला लागली 'त्या' गोष्टीची कुणकुण, सासूचे कात्रीने नाक कापले अन् नथ घेऊन पळाला; धक्कादायक प्रकरण

मुंबई तक

Crime News : एका जावयाने कात्रीने आपल्या सासूचे नाकच कापल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस तपासात यामागे एक भयानक कारण असल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातलं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जावयाला लागली 'त्या' गोष्टीची कुणकुण

point

सासूचे कात्रीने नाक कापले अन् नथ घेऊन पळाला

point

धक्कादायक प्रकरण

Crime News : जावई आणि सासू यांचं नातं काहीसं गुंतागुंतीचं असल्याचं पहायला मिळतं. या नात्यातील गंमती-जमती सांगणारं बरचसं लेखन आपल्या वाचनात येत असतं. यासोबतच काही गुन्हेदेखील घडत असतात. गुन्ह्याविषयी अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जावयाने कात्रीने आपल्या सासूचे नाकच कापल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस तपासात यामागे एक भयानक कारण असल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातलं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊया. 

हे ही वाचा : सोनं-चांदी, शेतजमीन ते कर्ज...; शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?

मुलीचा फोन बंद असल्याने आई-वडील चिंतेत

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी सरिता हिचे लग्न सुमारे चार वर्षांपूर्वी आरवा येथील रहिवासी सोहनलाल बिश्नोई याच्याशी झाले होते. सध्या सरिता जोधपूरमध्ये राहून शिक्षण घेत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सरिताचा फोन बंद असल्याने तिचे वडील बाबूलाल आणि आई केलीदेवी चिंतेत होते.

गाडी अडवून हल्ला

याप्रकरणी तक्रार देण्यासाठी बाबूलाल आणि त्यांची पत्नी सरवाना पोलीस ठाण्याकडे जात असताना, एका कारने त्यांची गाडी अडवली. त्या कारमध्ये सोहनलाल बिश्नोई आणि त्याचे इतर साथीदार होते. आरोप आहे की, या सर्वांनी केलीदेवी यांना जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवले आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान सोहनलालने कात्रीने आपली सासू केलीदेवी यांचे नाक कापले. एवढेच नाही तर त्याने नाकातील सोन्याचा दागिनाही हिसकावून घेतला आणि आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरुन पळ काढला.

हे वाचलं का?

    follow whatsapp