मेहुणा म्हणून ज्याला घरात आश्रय दिला, तोच पत्नीचा पहिला पती निघाला, वकिलाची आयुष्यातील सर्वात मोठी फसवणूक

मुंबई तक

Crime News : या प्रकरणातील पीडित वकील इंदूरच्या खुडैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांनी काही काळापूर्वी एका मॅट्रिमोनियल साईटवर निर्मला सेंगर नावाच्या महिलेशी ओळख झाल्यानंतर तिच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसांनी शुभम सेंगर नावाच्या एका तरुणाचे त्यांच्या घरी येणे-जाणे वाढले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मेहुणा म्हणून ज्याला घरात आश्रय दिला, तोच पत्नीचा पहिला पती निघाला,

point

वकिलाची आयुष्यातील सर्वात मोठी फसवणूक

Crime News : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका वकिलाची लग्नाच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या व्यक्तीला वकील आपल्या पत्नीचा भाऊ म्हणजेच मेहुणा समजत होते, तो प्रत्यक्षात त्या महिलेचा पहिला पती असल्याचे निष्पन्न झाले आहे. मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून ओळख करून लग्न करणाऱ्या या महिलेने आपल्या पहिल्या पतीच्या सोबतीने वकिलाच्या घरातील 25 तोळे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले असून पोलीस सध्या या दोघांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणातील पीडित वकील इंदूरच्या खुडैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांनी काही काळापूर्वी एका मॅट्रिमोनियल साईटवर निर्मला सेंगर नावाच्या महिलेशी ओळख झाल्यानंतर तिच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसांनी शुभम सेंगर नावाच्या एका तरुणाचे त्यांच्या घरी येणे-जाणे वाढले. वकिलांनी विचारणा केली असता, निर्मलाने शुभम हा आपला जवळचा नातेवाईक असल्याचे सांगितले. पत्नीवर विश्वास ठेवून वकिलांनी शुभमला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली आणि घरात स्थान दिले.

हेही वाचा : औषध घेण्यास नकार दिल्याने व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

काही दिवसांनंतर निर्मला अचानक घरातून गायब झाली. वकिलांनी घरातील कपाटाची तपासणी केली असता, त्यातील सुमारे 25 तोळे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने वकिलांनी स्वतः या प्रकरणाचा तपास केला असता त्यांना हादरवून टाकणारी माहिती मिळाली. नातेवाईक म्हणून ओळख करून दिलेला शुभम हा निर्मलाचा भाऊ नसून तिचा पहिला पती असल्याचे समोर आले. या दोघांनी 2024 मध्येच लग्न केले होते आणि जाणीवपूर्वक फसवणुकीच्या उद्देशाने हे कारस्थान रचले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp