वर्ल्डकप फायनल बघताना दोघांमध्ये वाद, दिव्यांग तरुणाला बेदम मारहाण करत केली हत्या
crime news : टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना बघताना एका दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. मृताचे नाव कुंदन कुमार (वय 18) असे त्याचे नाव आहे. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेल्याचे वृत्त आहे. गावात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
क्रिकेटचा सामना बघताना वादातून तरुणाचा मृत्यू
कुंदनचे डोके ब्रेकरवर आदळले
Crime News : टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना बघताना एका दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. मृताचे नाव कुंदन कुमार (वय 18) असे त्याचे नाव आहे. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेल्याचे वृत्त आहे. गावात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. ही घटना बिहारमधील वैशालीमध्ये घडली आहे.
हे ही वाचा : 8, 6 आणि 5 वर्षांच्या तीन चिमुकल्या मुलींना पाण्यात बुडवून मारलं, बापाने लेकींना का संपवलं?
क्रिकेटचा सामना बघताना वादातून तरुणाचा मृत्यू
संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, फोनवर सामना बघण्याच्या हेतून तरुणाने त्याला ढकलून दिले, ज्यात तो रस्त्यावर आदळला. नंतर त्याला बेदम मारहाण केली आणि तो जागीच बेशुद्ध पडला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी महनार येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले होते. प्राथमिक उपचारानंतर, त्याची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात रेफर केले होते.
तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले, दुसऱ्या रुग्णालयात जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना तात्कळपणे अटक करावी अशी मागणी आहे. संबंधित तरुणाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुरावे गोळा एक पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी क्रिकेटचा सामना बघत असताना झालेल्या एका वादातूनच ही घटना घडल्याचे सांगितले. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.










