वजन कमी करण्यासाठी यूट्यूब व्हिडीओ पाहून 'तो' पदार्थ खाल्ला, रात्रीतून जीव गेला...

मुंबई तक

एका तरुणीने वजन कमी करण्यासाठी उपाय शोधण्याच्या प्रयत्नात युट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला आणि त्यामध्ये सांगितलेला उपाय तिने केला. मात्र, हीच पद्धत तरुणीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरली.

ADVERTISEMENT

यूट्यूब व्हिडीओ पाहून 'तो' पदार्थ खाल्ला, रात्रीतून जीव गेला...
यूट्यूब व्हिडीओ पाहून 'तो' पदार्थ खाल्ला, रात्रीतून जीव गेला...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वजन कमी करण्यासाठी यूट्यूब व्हिडीओ पाहून 'तो' पदार्थ आणला

point

दुपारी केलं सेवन अन् रात्रीतून गेला जीव...

Viral Story: तमिळनाडूच्या मदुराई शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर तिला बारीक व्हायचं होतं आणि त्यासाठी बऱ्याच पद्धतींचा अवलंब करत होती. दरम्यान, वजन कमी करण्यासाठी उपाय शोधण्याच्या प्रयत्नात तिने युट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला आणि त्यामध्ये सांगितलेला उपाय तिने केला. मात्र, हीच पद्धत तरुणीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरली. 

स्लिम होण्यासाठी युट्यूबवर व्हिडीओ पाहिला अन्... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचं नाव कलाईयारसी असून फर्स्ट ईअर (13 वी) ची विद्यार्थीनी होती. तसेच, ती तिच्या आई-वडिलांसह सेल्लूर येथे राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कलाईयारसी तिच्या वाढत्या वजनामुळे खूप त्रस्त होती आणि त्यामुळे ती इंटरनेटवर वजन कमी करण्यासाठीचे उपाय शोधत होती. मागील आठवड्यातच, तिने युट्यूबवर यासंबंधीचा एक व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये वेंकारम म्हणजेच बोरेक्स नावाच्या पदार्थाचं सेवन केल्याने चरबी कमी होत असल्याचा दावा करण्यात आला होता. 

हे ही वाचा: 'मी तुळजापूरला नवस फेडायला गेले होते..', मोबाईल बंद कशामुळे होता? सरिता म्हस्केंनी घडलेलं सगळं सांगितलं

पदार्थाच्या सेवनाने उलट्या आणि जुलाब

हा व्हिडीओ पाहून पीडितेने 16 जानेवारी रोजी तिच्या घराजवळील एका दुकानातून संबंधित पदार्थ विकत घेतला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 17 जानेवारी रोजी व्हिडीओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तिने त्या पदार्थाचं सेवन केलं. काही वेळानंतर, तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले. तरुणीची अचानक प्रकृती बिघडल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली आणि त्यामुळे तिला तातडीने मुनिसलाई येथील एका प्रायव्हेट रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे उपचारानंतर, तिला घरी पाठवण्यात आलं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मेट्रो लाइन 2B वरील 'शून्य पूल' पूर्व-पश्चिम मुंबई जोडणार... लवकरच होणार कार्यान्वित!

संध्याकाळी अचानक तब्येत खालावली अन्... 

मात्र, संध्याकाळ होताच तिची तब्येत आणखी खालावली. तिच्या पोटात खूप दुखायला सुरूवात झाली आणि स्टूलमध्ये रक्त येत होतं. त्यावेळी, प्रचंड वेदना होत असल्याने ती खूप रडत होती. रात्री जवळपास 11 वाजताच्या सुमारास ती प्रकृती आणखी गंभीर झाली. त्यानंतर, शेजाऱ्यांच्या मदतीने तिला राजाजी या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, वाटतेच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि त्यानंतर, कुटुंबियांकडे तो मृतदेह सोपवण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता त्याची सत्यता आणि त्यात काही निष्काळजीपणा किंवा दिशाभूल करणारी माहिती होती का? याचाही पोलीस तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp