मुंबईची खबर: मेट्रो लाइन 2B वरील 'शून्य पूल' पूर्व-पश्चिम मुंबई जोडणार... लवकरच होणार कार्यान्वित!
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या मेट्रो लाईन 2B वरील 'झिरो पूल'चे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. हा पूल 750 टन स्टील वापरून बांधण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मेट्रो लाइन 2B वरील 'शून्य पूल' पूर्व-पश्चिम मुंबई जोडणार...
लवकरच होणार कार्यान्वित!
Mumbai News: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या मेट्रो लाईन 2B वरील 'झिरो पूल'चे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. हा पूल 750 टन स्टील वापरून बांधण्यात आला आहे. भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांना समर्पित आहे. या 130 मीटर लांबीच्या केबल-स्टेड पुलाचा आकार 'शून्य' दर्शवतो.
शून्य पुलाचं बांधकाम
शून्य पूल हा 130 मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल आहे, ज्यामध्ये 750 टन स्टीलचा वापर केला गेला आहे. या 130 मीटर लांबीच्या केबल-स्टेड पुलाचा मुख्य स्पॅन 80 मीटर आहे, जो वाकोला नाल्यावरून जातो. अंदाजे 40 मीटर उंच स्टीलचे हे खांब 10 प्री-फॅब्रिकेटेड सेक्शनमध्ये बांधण्यात आले होते आणि सुमारे 5.9 किलोमीटर लांबीच्या जागेवर वेल्डिंगद्वारे एकत्र करण्यात आले होते. अंतिम 'क्राउन एलिमेंट' बसवण्यासाठी 750 आणि 350 मेट्रिक टन वजनाच्या हेवी-ड्युटी क्रेनचा वापर करण्यात आला.
हे ही वाचा: Govt Job: SBI कडून मोठ्या पदांसाठी भरती, पगाराचा आकडा वाचून थक्कच व्हाल... काय आहे पात्रता?
मेट्रो 2B कॉरिडॉरवरील महत्त्वाचा मुद्दा
या पुलामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारेल. या पुलाला सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा म्हणून मान्यता मिळणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. याशिवाय, मेट्रो 2B कॉरिडॉरवरील पाच स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली होतील. त्यानंतर हा पूल आणखी उपयुक्त ठरेल. हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर, 'झिरो ब्रिज' मेट्रो 2B कॉरिडॉरवरील एक महत्त्वाचा मुद्दा ठरेल.
हे ही वाचा: मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, भाजपच्या गोटातून 'या' नगरसेविकेचं नाव सर्वात आघाडीवर
मुंबईतील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बांधलेला हा पूल कार्यक्षमता, नावीन्य, नवीन कल्पना आणि मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे. दरम्यान, मेट्रो लाईन 2 बी मधील पाच स्थानके प्रवासी सेवेसाठी जवळजवळ तयार आहेत. ही स्थानके लवकरच कार्यान्वित होतील. त्यापूर्वी मेट्रो रेल सुरक्षा आयोगाचे सर्व नियम पाळावे लागतील. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ही स्थानके जनतेसाठी खुली केली जातील.










