Govt Job: SBI कडून मोठ्या पदांसाठी भरती, पगाराचा आकडा वाचून थक्कच व्हाल... काय आहे पात्रता?
भारतीय स्टेट बँक (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, स्टेट बँकेकडून व्हाइस प्रेसिडेंट (स्टेट बँक उपाध्यक्ष), डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट (उप-उपाध्यक्ष), असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (सहाय्यक उपाध्यक्ष) अशा मोठ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
SBI कडून मोठ्या पदांसाठी भरती
पगाराचा आकडा वाचून थक्कच व्हाल...
काय आहे पात्रता आणि वयोमर्यादा?
Govt Job: सरकारी बँकेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, स्टेट बँकेकडून व्हाइस प्रेसिडेंट (स्टेट बँक उपाध्यक्ष), डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट (उप-उपाध्यक्ष), असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (सहाय्यक उपाध्यक्ष) अशा मोठ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
विशेषत: बँकेत नोकरीचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील.
काय आहे पात्रता?
भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये व्हाइस प्रेसिडेंट पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांकडे ऑफ डिझाइन/ बी.टेक/ बी.ई ची डिग्री किंवा कंप्यूटर सायन्स/ कंप्यूटर सायन्स अँड इंजीनिअरिंग/ सॉफ्टवेयर इंजीनिअरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स अशा संबंधित क्षेत्रात किमान 50 टक्के गुणांसह डिग्री किंवा MCA/ M.Tech/ M.sc ची डिग्री असणं आवश्यक आहे. यासोबतच, ह्युमन फॅक्टर्स इंटरनॅशनल, गूगल UX/इंटरेक्शन डिझाइन फाउंडेशन अशा विषयात UX सर्टिफिकेट असणं देखील गरजेचं आहे.
याव्यतिरिक्त, उमेदवारांना ई-कॉमर्स/ बँकिंग इंडस्ट्री/ फिनटेक कंपनी/ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी किंवा कंज्यूमर फेसिंग कंपनीत 15 वर्षांचा अनुभव असणं अनिवार्य आहे. तसेच, डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट पदासाठी देखील याच शैक्षणिक पात्रतेसह 12 वर्षांचा अनुभव विचारात घेतला जाईल. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट पदासाठी संबंधित डिग्रीसह 8 वर्षांचा अनुभव, यासोबतच सीनिअर स्पेशल एक्झिक्युटिव्ह पदासाठी 5 वर्षांचा अनुभव आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी 4 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. पात्रतेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.










