'मी तुळजापूरला नवस फेडायला गेले होते..', मोबाईल बंद कशामुळे होता? सरिता म्हस्केंनी घडलेलं सगळं सांगितलं

मुंबई तक

Shivsena Thackeray group corporator Sarita Mhaske : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना (ठाकरे गट) च्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के ह्या नॉट रिचेबल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. पक्षाच्या गट नोंदणीसाठी नवी मुंबई येथे झालेल्या बैठकीस त्या गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे त्या शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, या 24 तासांमध्ये म्हस्के कुठे होत्या याविषयी त्यांनी स्वत:च माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

Shivsena UBT Corporator Sarita Mhaske
Shivsena UBT Corporator Sarita Mhaske
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नॉट रिचेबल सरिता म्हस्के कुठे होत्या याविषयी त्यांनी स्वत:च माहिती दिली आहे.

point

तुळजापूरला नवस फेडायला गेल्याचं त्यांनी सांगितलं.

Shivsena Thackeray group corporator Sarita Mhaske : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना (ठाकरे गट) च्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के ह्या नॉट रिचेबल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. पक्षाच्या गट नोंदणीसाठी नवी मुंबई येथे झालेल्या बैठकीस त्या गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे त्या शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र 24 तासांच्या राजकीय नाट्यानंतर त्या समोर आल्या आणि या वादावर पडदा पडला. दरम्यान, या 24 तासांमध्ये म्हस्के कुठे होत्या याविषयी त्यांनी स्वत:च माहिती दिली आहे. जाणून घेऊया नेमक्या कुठे होत्या सरिता म्हस्के. 

हे ही वाचा : BMC Mayor: पाहा मुंबई महापालिकेत कोण होणार महापौर?, 'या' प्रवर्गासाठी निघालं आरक्षण

कुठे होत्या डॉ. सरिता म्हस्के?

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 157 मधून ठाकरे गटाच्या तिकिटावर सरिता म्हस्के निवडून आल्या आहेत. त्या नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर त्या समोर आल्याने या सर्व चर्चा थांबल्या असल्या तरी त्या नेमक्या कुठे होत्या? याविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. याविषयी स्वत: म्हस्के यांनी आता माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, 'मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे मला येण्यास उशीर झाला. माझ्या सुरक्षिततेसाठीसाठीच पक्षाकडून मला मोबाईल बंद ठेवण्यासाठी सांगण्यात आलं होतं. नऊ वर्षांच्या मेहनतीनंतर माझं तिकिट कापलं गेलं. त्यामुळे माझ्या मार्गातील अडथळे दूर होऊ देत म्हणून मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं होतं. सर्व अडथळे दूर झाल्यानंतर मी पाच दिवसांत दर्शनाला येईन असा नवस बोलले होते. त्यामुळे मी लगेचच देवीच्या दर्शनाला गेले होते. आम्ही ज्यावेळी पूजेला बसलो होतो त्यावेळीच नॉट रिचेबल होतो.'  

'मी शंभर टक्के ठाकरेंसोबत'

सरिता म्हस्के या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटातर्फे तिकिट न मिळाल्याने त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचं बोललं जात होतं.  नॉट रिचेबल झाल्यानंतर त्या पुन्हा एकदा शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याविषयी बोलताना म्हस्के म्हणाल्या की, 'मी शिंदे गटात जाणार ही विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शंभर टक्के उद्धव ठाकरेंसोबत होते, आहे आणि राहणार.'

हे वाचलं का?

    follow whatsapp