BMC Mayor: पाहा मुंबई महापालिकेत कोण होणार महापौर?, 'या' प्रवर्गासाठी निघालं आरक्षण
BMC Mayor Reservation: राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आज (22 जानेवारी) नगरविकास खात्याकडून महापालिकांमधील महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. जाणून घ्या मुंबई महापालिकेतील महापौर पद हे कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांमधील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज (22 जानेवारी) पार पडली. नगरविकास खात्याकडून ही सोडत जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये मुंबईसह सर्वच महापालिकांच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर केली गेली.
मुंबई महापालिकेत महापौर पद नेमकं कोणासाठी आरक्षित?
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून मुंबईत महापौर नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण त्याआधी महापौर पदासाठी जी सोडत निघते त्यात नेमकं कोणतं आरक्षण जाहीर होतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. त्यानुसार आज आरक्षण सोडत जाहीर झाली आणि मुंबईत नेमका कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार हे स्पष्ट झालं.
जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीनुसार मुंबईचं महापौर पद हे खुल्या (Open) प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालं आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर ही एक महिला असणार आहे.
| महापालिका | आरक्षण कोणासाठी | कोणासाठी आरक्षित |
| मुंबई महापालिका | खुला प्रवर्ग | महिलांसाठी आरक्षित |
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आलाय.










