पतीच्या मृत्यूनंतर 20 दिवसात पत्नीने दुसरं लग्न केलं, नणंद बाईला संशय आला, पुरलेली बॉडी बाहेर अन् भयंकर उलगडा

मुंबई तक

Crime News : परमेश यांच्या मृत्यूला 20 दिवस उलटत नाहीत तोच, पत्नी आशा हिने तिचा मित्र चंद्रप्पा याच्याशी लग्न केले. या घाईघाईत केलेल्या लग्नामुळे गावात आणि नातेवाइकांमध्ये चर्चेला उधाण आले. परमेश यांच्या बहिणींना हा प्रकार खटकला. पतीच्या निधनानंतर इतक्या कमी वेळात दुसरे लग्न करण्यामागे काहीतरी काळं-बेरं असल्याचा संशय त्यांना आला आणि त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीच्या मृत्यूनंतर 20 दिवसात पत्नीने दुसरं लग्न केलं

point

नणंद बाईला संशय आला, पुरलेली बॉडी बाहेर अन् भयंकर उलगडा

Crime News : पती आणि पत्नीचं नातं प्रेमाबरोबरच विश्वासाचंही नातं असतं. मात्र, सध्याच्या काळात विश्वासघाताच्याच अनेक बातम्या समोर येत आहेत. ज्या मृत्यूला महिनाभरापूर्वी साध्या 'हार्ट अटॅक'चे स्वरूप देण्यात आले होते, तो प्रत्यक्षात एक थंड डोक्याने केलेला खून असल्याचे उघड झाले आहे. प्रियकरासोबत मिळून पत्नीनेच पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकातल्या तुमकुरु तालुक्यातील हेब्बूर होबली येथील दसराहल्ली गावात राहणाऱ्या परमेश यांचा 30 जानेवारी रोजी अचानक मृत्यू झाला. त्यांची पत्नी आशा हिने सर्वांना सांगितले की, परमेश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा प्राण गेला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संशयाला जागा न ठेवता घाईघाईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : केतूचे भ्रमण आणणार समृद्धी, राजयोगासारखं सुख मिळणार, 'या' तीन राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु

संशयाची पहिली ठिणगी

परमेश यांच्या मृत्यूला 20 दिवस उलटत नाहीत तोच, पत्नी आशा हिने तिचा मित्र चंद्रप्पा याच्याशी लग्न केले. या घाईघाईत केलेल्या लग्नामुळे गावात आणि नातेवाइकांमध्ये चर्चेला उधाण आले. परमेश यांच्या बहिणींना हा प्रकार खटकला. पतीच्या निधनानंतर इतक्या कमी वेळात दुसरे लग्न करण्यामागे काहीतरी काळं-बेरं असल्याचा संशय त्यांना आला आणि त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली.

हे वाचलं का?

    follow whatsapp