मुख्याध्यापकाचा गावातील महिलांशी शरीरसंबंधांचा प्रयत्न, तरीही पोलिसांनी गावकऱ्यांनाच केली अटक; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : शिक्षकाने भावी पिढ्यांना संस्कार द्यायचे अशी समाजाची अपेक्षा असते. पण जर शिक्षकच चुकीचं वागत असेल तर? असंच चुकीचं वागणाऱ्या एका मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला. मात्र यानंतर पोलिसांनी गावातीलच लोकांना अटक केली आहे. गावकऱ्यांनी मुख्याध्यापकावर गावातील महिलांशी छेडछाड आणि त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्याध्यापकाचा गावातील महिलांशी शरीरसंबंधांचा प्रयत्न

point

तरीही पोलिसांनी गावकऱ्यांनाच केली अटक

point

नेमकं काय घडलं?

Crime News : शिक्षकाने भावी पिढ्यांना संस्कार द्यायचे अशी समाजाची अपेक्षा असते. पण जर शिक्षकच चुकीचं वागत असेल तर? असंच चुकीचं वागणाऱ्या एका मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला. मात्र यानंतर पोलिसांनी गावातीलच लोकांना अटक केली आहे. गावकऱ्यांनी मुख्याध्यापकावर गावातील महिलांशी छेडछाड आणि त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला आहे. ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील ही घटना आहे. गावकऱ्यांनी मुख्याध्यापकासोबत नेमकं काय केलं, जाणून घेऊया. 

हे ही वाचा : काँग्रेस नेत्याची आमदारकी रद्द, उच्च न्यायालयाने भाजपच्या पराभूत उमेदवाराला आमदार करुन टाकलं, नेमकं कारण काय?

'कांगारु कोर्टा'चा निर्णय

सुंदरगड जिल्ह्यातील एका निवासी शाळेचा हा मुख्याध्यापक आहे. त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी त्याला घेराव घातला आणि महिलांसह अनेक लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर एका कथित 'कांगारु कोर्टाच्या' (गावपातळीवरील अनधिकृत पंचायत) निर्णयानुसार, मुख्याध्यापकाच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांना संपूर्ण गावात फिरवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुख्याध्यापकाची जमावाच्या तावडीतून सुटका केली. पीडित मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी चार गावकऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp