महिला इव्हेंट मॅनेजरची निर्घृण हत्या! शेतात पुरलेला मृतदेह 10 दिवसांनंतर सापडला... मित्रानेच का काढला काटा?
एका महिला इव्हेंट मॅनेजरच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. 30 वर्षीय पूजा राणा नावाच्या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात एका तरुणाला अटक केली असून या प्रकरणाचा उलगडा केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला इव्हेंट मॅनेजरची निर्घृण हत्या!
शेतात पुरलेला मृतदेह 10 दिवसांनंतर सापडला...
मित्रानेच का काढला काटा?
Crime News: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बारादरी पोलीस स्टेशन परिसरात एका महिला इव्हेंट मॅनेजरच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. 30 वर्षीय पूजा राणा नावाच्या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात एका तरुणाला अटक केली असून या प्रकरणाचा उलगडा केला. प्राथमिक तपासात ही हत्या आर्थिक वादातून झाल्याचं दिसून येत आहे.
खरं तर, दुर्गा नगर येथील रहिवासी पूजा राणा ही 12 जानेवारी रोजी लग्नाला जात असल्याचं सांगून घरातून निघाली. जाताना तिने तिची आई महेंद्री देवी आणि बहीण शालिनी यांना सांगितले की तिला उशीर होऊ शकतो, पण त्यानंतर पूजा घरी परत आलीच नाही. दुसऱ्या दिवशी, जेव्हा तिचे वडील प्रेम सिंग यांनी आपल्या मुलीला फोन केला तेव्हा तिचा मोबाईल बंद होता. कुटुंबियांनी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली, पण त्यांना तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. शेवटी, अस्वस्थ होऊन तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळवलं.
हे ही वाचा: अंशिकाच्या न्यूड व्हिडीओ ट्रॅपमध्ये पोलीस सुद्धा सहभागी... 'या' तरुणीचा कारनामा वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
पोलिसांनी बेपत्ता तरुणीची तक्रार नोंदवून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि कॉल डिटेल्स देखील मिळवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पूजा एका कारमध्ये निघून कुठेतरी जाताना दिसत होती. दरम्यान, पोलिसांना एका तरुणावर संशय आला. त्यांनी रिथोरा येथील रहिवासी असलेल्या विमल कुमार नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, आरोपीने हत्येची कबुली दिली. त्याने पूजाचा गळा दाबून खून केल्याचं सांगितलं आणि केसीएमटी कॉलेजच्या मागे असलेल्या एका निर्जन शेतात तिचा मृतदेह पुरला.
त्यानंतर, पोलिसांनी शेतात खोदकाम केलं आणि मृतदेह बाहेर काढून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पूजाचे वडील प्रेम सिंग यांचा आरोप आहे की त्यांची मुलगी एक स्कूटर, तीन अंगठ्या, दोन चेन, एक पेंडेंट आणि कानातले घेऊन गेली होती. त्यांचा दावा आहे की ही हत्या चोरीच्या उद्देशाने रचण्यात आली होती. शिवाय, आरोपी आणि पूजामध्ये आर्थिक व्यवहार होता आणि घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, पूजाची स्कूटर पीलीभीत कालव्यात फेकण्यात आली होती, तर मृतदेह नकटिया नदीकाठी जंगलात पुरण्यात आला होता. पोलीस सध्या आरोपींची सखोल चौकशी करत आहेत आणि या हत्येत आणखी कोणी सहभागी आहे का? हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.










