अंशिकाच्या न्यूड व्हिडीओ ट्रॅपमध्ये पोलीस सुद्धा सहभागी... 'या' तरुणीचा कारनामा वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

मुंबई तक

महिला डॉन अंशिका सिंग ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंशिकाने केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर अनेक पोलिस अधिकाऱ्यांनाही तिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आहे. नेमकं काय प्रकरण? सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंशिकाच्या न्यूड व्हिडीओ ट्रॅपमध्ये पोलीस सुद्धा सहभागी...

point

'या' तरुणीचा कारनामा वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूरची रहिवासी असलेली महिला डॉन अंशिका सिंग ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ती आता जरी तुरुंगात असली तरी तिचे कारनामे आता खाकी गणवेशावर कलंक लावत असल्याचं सांगितलं जात आहे. तिच्याबाबत दररोज होणाऱ्या नवीन खुलाशांमुळे पोलिस विभागात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, अंशिकाने केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर अनेक पोलिस अधिकाऱ्यांनाही तिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आहे. नेमकं काय प्रकरण? सविस्तर जाणून घ्या.

पैशांसाठी खोट्या प्रकरणांमध्ये अडकवायची...  

सूत्रांच्या माहितीनुसार, अंशिकाने आधी सोशल मीडियाद्वारे लोकांशी मैत्री केली आणि नंतर त्यांना प्रेमसंबंधाचं नाटक करून आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉल करून त्यांचे नग्न व्हिडिओ बनवले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. पैसे उकळण्यासाठी, अंशिका पीडितांना खोट्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये किंवा लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत अडकवण्याची धमकी द्यायची. या भीतीमुळे अनेक लोकांना तिला मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

हे ही वाचा: मर्डर करुन तुरुंगात गेली अन् दुसऱ्या कैद्याच्या प्रेमात पडली, लग्नासाठी दोघं पॅरोलवर बाहेर; 15 दिवसांनी पुन्हा आत जाणार

बेकायदेशीर व्यवसायात पोलिसांचा देखील सहभाग 

आणखी एक धक्कादायक दावा असा आहे की काही पोलीस अंशिकाच्या केवळ गुन्हेगारी नेटवर्कचे बळी बनले नाहीत तर काही जण तिच्यासोबत या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी होते. 20 जानेवारी रोजी रुग्णालयाचे व्यवस्थापक विशाल मिश्रा यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी अंशिकाला अटक केली तेव्हा तिच्या मोबाईल फोनवरून अनेक धक्कादायक उघडकीस आल्या. अंशिकाच्या फोनवर अनेक मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या लोकांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याचा दावा केला जात आहे. मात्र, पोलिसांचे म्हणणं आहे की अद्याप कोणत्याही पीडित व्यक्तीने ब्लॅकमेलिंगबाबत लेखी तक्रार दाखल केलेली नाही.

हे ही वाचा: पुणे : पतीला सोडून शाहरुखसोबत 2 महिने लिव्ह इनमध्ये राहिली नम्रता, संतापलेल्या नवऱ्याने केला खून

अंशिका सिंगचे कारनामे हे फक्त ब्लॅकमेलिंगपुरते मर्यादित नव्हते. तपासात असं दिसून आलं आहे की यापूर्वीही तिच्या टोळीवर करारानुसार वाहन खरेदी आणि विक्री तसेच फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या, पोलीस अंशिकाचं संपूर्ण नेटवर्क आणि तिला मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp