नशायुक्त पदार्थ देऊन बनवला गर्लफ्रेंडचा अश्लील व्हिडिओ; दुसऱ्यासोबत लग्न ठरताच केला व्हायरल, मात्र बॉयफ्रेंडचा वेगळाच दावा
Samastipur Crime News : एका तरुणीने तिच्या प्रियकरावर कोल्ड्रिंकमध्ये नशायुक्त पदार्थ मिसळून अश्लील व्हिडिओ बनवण्याचा आणि नंतर वर्षानुवर्षे ब्लॅकमेल करण्याचा आरोप केला आहे. तसंच तिचे दुसऱ्यासोबत लग्न ठरल्यानंतर हा व्हिडिओ पाठवून लग्न मोडण्याचा प्रयत्नही त्याने केल्याचं पीडितेने सांगितलं आहे. प्रियकराने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी बनवून तिचे फोटोदेखील व्हायरल केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोल्ड्रिंकमध्ये नशायुक्त पदार्थ मिसळून बनवला गर्लफ्रेंडचा व्हिडिओ
गर्लफ्रेंडचे लग्न ठरताचे केला व्हायरल
Samastipur Crime News : एका तरुणीने तिच्या प्रियकरावर कोल्ड्रिंकमध्ये नशायुक्त पदार्थ मिसळून अश्लील व्हिडिओ बनवण्याचा आणि नंतर वर्षानुवर्षे ब्लॅकमेल करण्याचा आरोप केला आहे. तसंच तिचे दुसऱ्यासोबत लग्न ठरल्यानंतर हा व्हिडिओ पाठवून लग्न मोडण्याचा प्रयत्नही त्याने केल्याचं पीडितेने सांगितलं आहे. प्रियकराने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी बनवून तिचे फोटोदेखील व्हायरल केले. याविषयी पीडितेने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करत आहेत.
बेशुद्ध करुन बनवला अश्लील व्हिडिओ
बिहारच्या समस्तीपूरमधील हे प्रकरण आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती कल्याणपूर भागातील शाळेत शिकत असताना आरोपीसोबत २०२१ मध्ये तिची ओळख झाली. हळूहळू ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. काही काळ दोघांचं नातं व्यवस्थित चाललं होतं. मात्र आरोपीने तिला बर्थडे पार्टीला बोलावून तिच्यासोबत घात केला. बर्थडे पार्टीवेळी आरोपीने तिला नशायुक्त कोल्ड्रिंक प्यायला दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ बनवला.
इंस्टाग्रामवरुन व्हायरल केले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ
पीडितेने आरोप केला आहे की, हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने सतत ब्लॅकमेल केले. त्याचं म्हणणं ऐकलं नाही तर तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तो धमकी देत असे. लोकलज्जेमुळे पीडिता बराच काळ गप्प बसली. मात्र जेव्हा आरोपीने पीडितेच्या नावाने बोगस इंस्टाग्राम अकाऊंट बनवून त्यावर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. पीडितेनं हे सगळं बंद करण्याची आरोपीला वारंवार विनंती केली, त्याच्या बहिणीलाही हे सगळं सांगितल; मात्र आरोपीवर याचा काहीच परिणाम झाला नाही.










