मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या 65 वर्षीय महिलेला कारने धडक देत चिरडलं, पुण्यात हिट अँड रनचा थरार सुरुच

मुंबई तक

Pune Hit And Run : पुणे शहरात वारंवार हिट अँड रनसारखी प्रकरणं उघडकीस येऊ लागली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका 65 वर्षीय महिलेला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा धक्कादायक प्रकार पहाटे 5.30 ते 6.00 वाजताच्या दरम्यान झाला.

ADVERTISEMENT

Pune Hit And Run
Pune Hit And Run
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील पाषाण रोडवर हिट अँड रन

point

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद 

Pune Hit And Run : Aditya Bhawar - पुणे शहरात वारंवार हिट अँड रनसारखी प्रकरणं उघडकीस येऊ लागली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका 65 वर्षीय महिलेला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा धक्कादायक प्रकार पहाटे 5.30 ते 6.00 वाजताच्या दरम्यान झाला. अपघातात मृत पावलेल्या महिलेचं नाव आशा पाटील (वय 65) असे होते. 

हे ही वाचा : आजचा दिवस 'या' राशीतील लोकांसाठी कठीण, तर दिवसाच्या शेवटी मिळेल 'ही' गोष्ट

पुण्यातील पाषाण रोडवर हिट अँड रन

घडलेल्या घटनेनुसार, हा भीषण अपघात पाषाण रोडवरील एनसीएल इन्स्टिट्यूटसमोर घडला. या अपघातात कार चालकाने धडक देऊन तो घटनास्थळावरून फरार झाला. या धडकेत अशा भोसले यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. अशा स्थितीत त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं होतं, नंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजल्याचं चित्र आहे. 

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : वसतीगृहात राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ गुपचूप शूट केले, अन् बॉयफ्रेंडला पाठवले

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद 

संबंधित अपघाताची माहिती चतु:श्रृंगी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नंतर पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली होती. घटनास्थळी घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं वृत्त आहे. यच सीसीटीव्हीच्या आधारे वाहनचालकाचा शोध सुरु आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या वाढत्या हिट अँड रनप्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp