बीड : पत्नीचा ह्रदयविकाराने मृत्यू, गावाकडे अंत्यसंस्काराची तयारी, पण पोलिसांना शंका आल्याने भयंकर कांड उघडकीस
Beed Crime News : गुन्हा लपवण्यासाठी सुरेशने तातडीने एक क्रुझर गाडी भाड्याने केली आणि मृतदेह घेऊन थेट देगलूर तालुक्यातील आलुरा गाठले. मात्र, बर्दापूर पोलिसांना या संशयास्पद मृत्यूची गुप्त माहिती मिळाली. बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी वेळ न घालवता देगलूर पोलिसांशी संपर्क साधला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : पत्नीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचं सांगून अंत्यसंस्काराची तयारी,
पण पोलिसांना शंका आल्याने भयंकर कांड उघडकीस
Beed Crime News : रोहिदास हातागळे/बीड : शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या एका पतीने पत्नीच्या डोक्यावर काठीने मारहाण करून निघृण खून केला आणि तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेला. मात्र, बर्दापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा थरारक बनाव उघड झाला असून अंत्यविधीच्या पूर्वीच मृतदेहासह पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातोला शिवारात घडली आहे. शीलाबाई सुरेश शेरफुले (वय 45, रा. आलुरा, ता. देगलूर, जि. नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश शेरफुले हा हातोला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून पत्नीसह राहत होता. मागील 3-4 दिवसांपासून तो गावाकडे जाऊ म्हणून पत्नीकडे आग्रह धरत होता, पण ती तयार नव्हती. याच कारणावरून शुक्रवारी, 23 जानेवारी रोजी दोघांत तीव्र वाद झाला असल्याची चर्चा आहे. रागाच्या भरात सुरेशने जाड भरीव काठीने शीलाबाईच्या डोक्यात एकामागून एक अनेक वार केले. या हल्ल्यात शीलाबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुरेशने हा खून पचवण्यासाठी परिसरातील लोकांना आणि गावाकडे नातेवाईकांना शीलाबाईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे खोटे सांगितले.
गुन्हा लपवण्यासाठी सुरेशने तातडीने एक क्रुझर गाडी भाड्याने केली आणि मृतदेह घेऊन थेट देगलूर तालुक्यातील आलुरा गाठले. मात्र, बर्दापूर पोलिसांना या संशयास्पद मृत्यूची गुप्त माहिती मिळाली. बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी वेळ न घालवता देगलूर पोलिसांशी संपर्क साधला. देगलूरचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी यांनी तातडीने आलुरा गाव गाठले. तिथे शीलाबाईच्या माहेरच्या लोकांनाही डोक्यावरील जखमा पाहून संशय आला होता. पोलिसांनी अंत्यसंस्कारापूर्वीच मृतदेह ताब्यात घेऊन पती सुरेशला ताब्यात घेतले.










