बार्शी : हॉस्टेलवर राहणारी मुलगी फोन उचलत नसल्याने आई रात्रभर चिंतेत, सकाळी आलेल्या बातमीने हळहळ
Barshi Suicide News : बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारातील एमआयटी (MIT) कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकिता शिवाजी शिंदे (वय 20, रा. अंबुलगा बुद्रुक, ता. निलंगा, जि. लातूर) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
होस्टेलवर राहणारी मुलगी फोन उचलत नसल्याने आई रात्रभर चिंतेत
सकाळी आलेल्या बातमीने हळहळ
Barshi Suicide News, विजय बाबर : बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारातील एमआयटी (MIT) कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकिता शिवाजी शिंदे (वय 20, रा. अंबुलगा बुद्रुक, ता. निलंगा, जि. लातूर) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : शिक्षिकेची स्वयंपाकघरात गळा चिरुन हत्या; माजी भाजप प्रवक्ता ताब्यात, सुरुवातीच्या तपासानंतर वेगळाच ट्विस्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि एमआयटी कॉलेजच्या महिला सुरक्षारक्षक अनिता विनायक साखरे (वय 41) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी उघडकीस आली. अंकिता शिंदे ही मूळची लातूर जिल्ह्यातील असून ती शिक्षणासाठी एमआयटी कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती.वसतिगृहातील ब्लॉक नंबर 106 मधील 32 नंबरच्या खोलीत ती राहत होती.
दुसऱ्या विद्यार्थिनीने दिली 'ही' माहिती
सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास वसतिगृहातील दुसरी विद्यार्थिनी भाग्यश्री सूर्यवंशी हिने सुरक्षारक्षक अनिता साखरे यांना सांगितले की, 'काल रात्री 12 वाजल्यापासून अंकिता तिच्या आईचा फोन उचलत नाहीये आणि ती खोलीत एकटीच आहे.' या माहितीवरून साखरे यांनी तात्काळ अंकिताच्या खोलीकडे धाव घेतली. सुरक्षारक्षकांनी दरवाजा वाजवला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.वदरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला असता खिडकीला पडदे लावलेले होते. अखेर खिडकीची लॅच (कडी) तोडून आत डोकावले असता, अंकिताने खोलीतील सिलिंग फॅनला पांढऱ्या रंगाच्या नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.










