चौथीच्या विद्यार्थ्याला काळंनिळं पडेपर्यंत मारलं, प्रश्नाचं उत्तर न दिल्याने बुलढाण्यातील शिक्षकाची क्रूरता

मुंबई तक

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या १० वर्षीय पवन नारायण इंगळे या विद्यार्थ्याला शिक्षकाने लोखंडी पट्टीने मारहाण केली.

ADVERTISEMENT

Buldhana News
Buldhana News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चौथीच्या विद्यार्थ्याला काळंनिळं पडेपर्यंत मारलं

point

प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने बुलढाण्यातील शिक्षकाची क्रूरता

Buldhana News, जका खान : बुलढाणा जिल्ह्यातील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या १० वर्षीय पवन नारायण इंगळे या विद्यार्थ्याला शिक्षकाने लोखंडी पट्टीने मारहाण केली. या संदर्भात विद्यार्थ्याच्या वडिलांनी काल रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर आज त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : पन्नासपर्यंत आकडे न लिहिला आल्याने चार वर्षाच्या मुलीला केलं ठार; संतापलेल्या बापाचं कृत्य, रिमान्डमध्ये घेताच दिली कबुली

शाळेत नेमकं काय घडलं?

विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर त्याची आजी त्याचा गणवेश काढत होती. त्यावेळी तो मुलगा वेदनेने विव्हळू लागला. आजीने शर्ट काढताच तिला धक्काच बसला. तिला मुलाच्या पाठीवर, हातावर आणि पायावर काळे-निळे वळ उठल्याचे दिसले. आजीने ही बाब त्या मुलाच्या वडिलांना सांगितली. मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून वडीलही हादरले. वडिलांनी विचारले असता मुलाने सांगितले की, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही म्हणून त्यांनी लोखंडी पट्टीने त्याला बेदम मारले.

हे ही वाचा : झालं आता कलेक्टर होणार, 8 वी शिकलेल्या रामूने मुलीला गंडवलं, शरीरसुख घेतल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

हे वाचलं का?

    follow whatsapp