जालना : कॉलेजला निघालेल्या तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवून आळंदीला नेलं, अन् थेट लग्नच केलं
Jalana News : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिरायला जायचे म्हणून कॉलेजला निघालेल्या एका तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवण्यात आले. यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन थेट आळंदीला नेत तिच्यासोबत बळजबरीने लग्न केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या नातेवाईकांनीच हा प्रकार केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कॉलेजला निघालेल्या तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवून आळंदीला नेलं
जबरदस्तीने लावले लग्न
Jalana News : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजला निघालेल्या एका तरुणीला फिरायला जायचे म्हणून बळजबरीने कारमध्ये बसवण्यात आले. यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन थेट आळंदीला नेत तिच्यासोबत बळजबरीने लग्न केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या नातेवाईकांनीच हा प्रकार केला. याप्रकरणी नातेवाईकांविरोधात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे ही वाचा : चौथीच्या विद्यार्थ्याला काळंनिळं पडेपर्यंत मारलं, प्रश्नाचं उत्तर न दिल्याने बुलढाण्यातील शिक्षकाची क्रूरता
जीवे मारण्याची धमकी देत कारमध्ये बसवले
अंबड तालुक्यातील शहागड जवळील एका गावातील 19 वर्षीय तरुणी ही दररोज महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेवराई येथे जाते. 21 जानेवारी रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी बसस्थानकावर उभी असताना, तिचे नातेवाईक असलेले आरोपी महेश राजेंद्र काकडे आणि सोनू राजेंद्र काकडे, यांच्यासह दोन महिला (रा. सारंगपूर, ता. अंबड) कारने त्या ठिकाणी आले. आरोपींनी तरुणीला फिरायला जायचे आहे, आमच्यासोबत चल, असे सांगितले. मात्र मला कॉलेजला जायचे आहे, मला यायचे नाही, असे सांगत तरुणीने स्पष्टपणे नकार दिला. तरीही आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने कारमध्ये बसवले.
हे ही वाचा : बीड : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा बिंदुसरा धरणात मृतदेह आढळला, पाली गावावर शोककळा
आळंदीत नेऊन जबरदस्तीने केले लग्न
जीवे मारण्याची धमकी देत तरुणीला कारमध्ये बसवल्यानंतर आरोपींनी तिला थेट आळंदी येथे नेले. याठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध आरोपी महेश काकडे याच्याशी बळजबरीने तिचे लग्न लावण्यात आले. या प्रकारानंतर पीडित तरुणीने गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत.










