Govt Job: भारतीय हवाई दलात सहभागी होऊन देशसेवेची सुवर्णसंधी... 12 वी पास तरुणांसाठी मोठी भरती
भारतीय हवाई दलात एअरमेन बनण्याची पुरुषांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय हवाई दलाने पुरुषांसाठी मेडिकल असिस्टंट ट्रेड म्हणजेच वैद्यकीय सहाय्यक व्यापारात रिक्त पदांची घोषणा केली आहे. हवाई दलांकडून एअरमेन इनटेक 01/2027 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवाई दलात सहभागी होऊन देशसेवेची सुवर्णसंधी...
12 वी पास तरुणांसाठी मोठी भरती
Govt Job: भारतीय हवाई दलात एअरमेन बनण्याची पुरुषांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय हवाई दलाने पुरुषांसाठी मेडिकल असिस्टंट ट्रेड म्हणजेच वैद्यकीय सहाय्यक व्यापारात रिक्त पदांची घोषणा केली आहे. हवाई दलाकडून एअरमेन इनटेक 01/2027 पदांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. या भरतीसाठी 12 जानेवारी 2026 रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 1 फ्रेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली असून यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), जीवशास्त्र (बायोलॉजी) आणि इंग्रजीमध्ये किमान 50 टक्के गुणांसह 10+2/ इंटरमीडिएट/ समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच त्यांना इंग्रजीमध्ये किमान 50 टक्के गुण असले पाहिजेत. याशिवाय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांत दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, डिप्लोमा/ बी.एससी, फार्मसीसाठी, उमेदवारांनी किमान 50 टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ इंग्रजी या विषयांसह इंटरमिजिएट/ 10+2/ समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये त्यांची वैध नोंदणी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
मेडिकल असिस्टंट ट्रेड (10+2) साठी, उमेदवाराची जन्मतारीख 1 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2010 दरम्यान असावी. तसेच मेडिकल असिस्टंट ट्रेड (डिप्लोमा/ बी.एससी. फार्मसी) पदांसाठी (अविवाहित पुरुष) उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान असावा आणि विवाहित पुरुष उमेदवारांसाठी, जन्मतारीख 1 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2006 दरम्यान असणं अनिवार्य आहे.
लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी म्हणजेच मेडिकल टेस्ट या टप्प्यांमार्फत उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.










