Crime : दहा वर्षीय मुलीची हत्या केली, मग जोडप्याने घेतला गळफास; रिसॉर्टमध्ये काय घडलं?

प्रशांत गोमाणे

• 07:22 AM • 10 Dec 2023

रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी अब्राहम यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला असता त्यांनी उघडलाच नाही. यानंतर डुप्लिकेट चावीने रूम उघडताच कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

karnataka crime kadagu family of three dies by suicide daughter killed then couple self suicide crime news

karnataka crime kadagu family of three dies by suicide daughter killed then couple self suicide crime news

follow google news

Karnataka crime News : देशभरात सामूहिक आत्महत्या करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एक कुटुंब रिसॉर्टला फिरायला गेले होते. याच रिसॉर्टमध्ये आता या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या कुटुंबामध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या मुलीचा समावेश आहे. या घटनेने आता एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस तपास सुरू केला आहे.दरम्यान या कुटुंबियाने सामूहिक आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करीत आहेत. (karnataka crime kadagu family of three dies by suicide daughter killed then couple self suicide crime news)

हे वाचलं का?

कर्नाटकच्या (karnataka)  कोडागू (kadagu) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. मुळचा केरळचा असलेला अब्राहम त्याच्या कुटुंबियाला घेऊन रिसॉर्टला गेला होता. खरं तर रिसॉर्टला जाऊन मजा मस्ती करण्याचा अनेकांचा बेत असतो. मात्र अब्राहम यांचा वेगळाच बेत असल्याचे या घटनेवरून समजते. कारण शनिवारी संध्याकाळी रिसॉर्टच्या रूममध्ये अब्राहमच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने रिसॉर्टमध्ये एकच खळबळ माजली आहे.

हे ही वाचा : Gopichand Padalkar : इंदापुरात आमदार पडळकरांवर भिरकावल्या चप्पला; भुजबळ भडकले

रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी अब्राहम यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला असता त्यांनी उघडलाच नाही. यानंतर डुप्लिकेट चावीने रूम उघडताच कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत या घटनेचा तपास सूरू केला.

घटनास्थळी म्हणजेच रिसॉर्टमधील रूममध्ये 43 वर्षीय अब्राहम यांचा आणि त्यांच्या 35 वर्षीय पत्नीचा मृतदेह रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. तर त्याची 10 वर्षीय मुलगी बेडवर मृतावस्थेत सापडली आहे.या तीनही जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आता पोस्टमार्टम अहवालातून मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

हे ही वाचा :Solapur : स्वतःच्या श्रद्धांजलीच स्टेटस ठेवलं अन् झाडल्या तीन गोळ्या, कारण…

दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये आर्थिक विवंचनेतून कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सूरू केला आहे. तसेच या सामूहिक आत्महत्येमागचं खरं कारण शोधायला सुरुवात केली आहे.

    follow whatsapp