Samay Raina : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा अल्पावधीत लोकप्रिय झालेला कार्यक्रम चांगलाच वादात सापडला होता. याप्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने सोमवारी स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा जबाब नोंदवला. या प्रकरणामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता सायबर सेलने समय रैनाला चौकशीसाठी बोलावलं होतं.समय रैनाने माफी मागितली आणि सांगितलं की जे काही झालं ते शोच्या फ्लोमध्ये होत गेलं.
ADVERTISEMENT
समय रैनाने महाराष्ट्र सायबर सेलसमोर दिलेल्या निवेदनात कबूल केलं की, शो दरम्यान त्याने जे काही बोलले त्याबद्दल मला मनापासून पश्चाताप होतोय. तो म्हणाला, "माझ्याकडून चूक झाली हे मला मान्य आहे. शो दरम्यान सर्वकाही फ्लोमध्ये घडलं. मी जे काही बोललो ते मी विचार न करता बोललो. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता."
हे ही वाचा >> Eknath Shinde : कुणाल कामरावर पहिल्यांदाच बोलले, एकनाथ शिंदे म्हणाले 'त्या' तोडफोडीचं समर्थन नाही, पण...
समय रैनाने याबद्दल बोलताना सांगितलं की, या घटनेतून धडा घेणार असून, भविष्यात अशी चूक होणार नाही याची पूर्ण काळजी घेणार आहे. या वादाचा आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाला असं समय म्हणाला. तसंच या संपूर्ण घटनेमुळे मी खूप तणावात आहोत आणि माझी मानसिक स्थिती ठीक नसल्याचं त्यानं सांगितलंय.
दरम्यान, या वादामुळे त्यांचा नुकताच झालेला कॅनडा दौराही चांगला झाला नसल्याचं त्यांनं सांगितलं. तो म्हणाला, "मी जे बोललो ते चुकीचं आहे, याची मला जाणीव आहे. त्याबद्दल मी माफी मागतो."
प्रकरणाचा तपास सुरू आहे
महाराष्ट्र सायबर सेल या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर सेलला आवश्यकता वाटल्यास ते समयला पुन्हा चौकशीसाठी बोलावू शकतात.
हे ही वाचा >> Nikhil Wagle : आधी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी माफी मागावी, 'त्या' हल्ल्याचा उल्लेख, वागळे काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी या संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. अनेकांनी रैनाचं विधान गंभीर असल्याचं म्हटलं. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर काही लोकांच्या मते ती एक साधी चूक होती. त्याला आणखी एक संधी दिली जावी.
काय घडली होती घटना?
अलाहाबादियाने समय रैनाच्या वेब शो "इंडियाज गॉट लेटेंट" वर पालकांशी संबंधित विवादास्पद टिप्पण्या केल्या होत्या. ज्यामुळे मोठा संताप निर्माण झाला आणि अनेक पोलिस तक्रारी झाल्या. पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि इतरांविरुद्ध दाखल करण्यात आला होता. रैनाला अनेकवेळा समन्स पाठवण्यात आलं होतं, मात्र तो परदेशात असल्यानं हजर राहिला नाही. नुकताच भारतात परतल्यानंतर त्यानं सोमवारी महाराष्ट्र सायबर मुख्यालयात आपला जबाब नोंदवला.
ADVERTISEMENT
