Crime News: समलैंगिक संबंधाच्या कारणावरून एका महिलेने आपल्या 5 महिन्यांच्या मुलाची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही तमिळनाडूच्या केलमंगलम येथे घडल्याची माहिती आहे. आरोपी महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे एका दुसऱ्या महिलेसोबत समलैंगिक संबंध होते. मात्र, या संबंधात तिचा 5 महिन्यांचा मुलगा आड येत असल्याकारणाने तिने आपल्या मुलाची निर्घृण हत्या केली. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
पत्नीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध...
26 वर्षीय भारती नावाच्या महिलेचं एका सुरेश नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर, दोघांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. मात्र, चांगला संसार सुरू असताना भारतीचे तिच्याच परिसरात राहणाऱ्या एका सुमित्रा (22) नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. पती कामाला बाहेर गेल्यानंतर, भारती नेहमी सुमित्राच्या घरी तिला भेटण्यासाठी जायची. इतकेच नव्हे तर, त्या दोघींनी आपल्या हातावर एकमेकांच्या नावाचे टॅटू सुद्धा गोंदवले होते.
हे ही वाचा: एका मुलाच्या आईवर जडला 14 वर्षीय तरुणाचा जीव! शेतात शारीरिक संबंध ठेवायला गेला अन् नको ते घडलं...
प्रेमसंबंधात आड येत असल्याने बाळाची हत्या!
दरम्यान, भारतीला मुलगा झाल्यानंतर दोघींमध्ये सतत वाद होऊ लागले. त्यावेळी, भारतीचा मुलगा प्रेमसंबंधात आड येत असल्याचं सुमित्राला वाटू लागलं. याच कारणावरून, त्या दोघींमध्ये सतत भांडणं व्हायची. एके दिवशी, रागाच्या भरात भारतीने आपल्या पाच महिन्यांचा बाळाच गळा दाबून त्याची हत्या केली. हत्येनंतर, आरोपी महिलेने कुटुंबियांना सांगितलं की, बाळाला स्तनपान करत असताना त्याच्या डोक्याला मार लागला आणि यात बाळाचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी सुद्धा भारतीचं बोलणं खरं मानून मुलाचे अंत्यसंस्कार केले.
हे ही वाचा: लोन वसूलीसाठी मुंबईतील रिकव्हरी एजंटचं घाणेरडं कृत्य! ग्राहकाच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करून व्हायरल...
पतीला सापडले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ
परंतु, काही दिवसांनंतर भारतीच्या पतीला तिच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सापडले. यामध्ये, भारती आणि सुमित्राचे खाजगी क्षण रेकॉर्ड झाले होते. यावरूनच, सत्य घटना उघडकीस आली. भारतीच्या पतीने लगेच पोलीस स्टेशनमध्ये पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आणि सगळे पुरावे सुद्धा पोलिसांकडे सोपवले. सध्या, पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT











