Crime News : एका विवाहित महिलेनं गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात मृताच्या आईने तिच्या जावयावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. संबंधित प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई केली. हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील पुरुवाला पोलीस ठाण्यातील हद्दीत घडल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तरुणीचा मानसिक छळ, तीन पुरुष सतत करत होते ब्लॅकमेल, पंख्याला गळफास घेत संपवलं जीवन
प्रेमविवाह पत्नीसाठी धोकादायक
या प्रकरणात मृत महिलेची ओळख ही रजनी (वय 26) अशी झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे अडीच वर्षांपूर्वी रजनी राजकुमारसोबत पळून गेली होती, त्यांनी प्रेमविवाह केला होता. हाच प्रेमविवाह पीडित महिला रजनीसाठी धोकादायक ठरला.
जावई राजकुमार उर्फ रोहितवर गंभीर आरोप
दरम्यान, मृत महिलेची आई शिमला देवी यांनी तिच्या मुलीच्या मृत्यूसाठी जावई राजकुमार उर्फ रोहितवर अनेक गंभीर आरोप केले. कुटुंबाचा आरोप असा की, विवाहानंतर राजकुमारच्या वर्तनात मोठा बदल झाला होता. दोन वर्षांपासून त्याने पत्नी रजनीला बेदम मारहाण करत तिचा छळ केला. परिस्थिती बघता, रजनी आणि लहान मुलाला तिच्या पालकांच्या घरी जाऊ दिले नाही, तथापि पोलिसांनी आरोपीची चौकशी देखील केली.
हे ही वाचा : महिलेने रागाच्या भरात लिव्ह इन पार्टरनला ड्रग्ज देऊन त्याचे गुप्तांग कापले, नंतर घटनास्थळावरून काढला पळ
पोलिसांनी तपास करत आरोपीची कसून चौकशी करत आहेत. तसेच सासू, सासरे यांचा देखील तपास केला जात आहे. या एकूण तपासातून जे समोर येईल त्यातूनच कारवाई केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे. सिरमौर जिल्हा पोलिस अधीक्षक निश्चय सिंग नेगी यांच्या म्हणण्यानुसार, मृताच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT











