Crime News : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील मेरठ-बागपत महामार्गावरील बलानी टोल प्लाझा येथील महिलांच्या शौचालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या प्रकरणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे महिलांच्या गोपनीयतेबाबतचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रंग लावण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग, नंतर घरात घुसून केली मारहाण
टोल कर्मचाऱ्यांनी पुरुषाकडून टोलचे पैसे उकळले
संबंधित प्रकरणाची तक्रार ही विक्रांत त्यागी नामक पुरुषाने केली केली आहे. त्याच्या म्हणण्यांनुसार, तो शेतातून गाडीने घरी परतत होता. तेव्हा टोल प्लाझापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या बालानी रोडवर, टोल कर्मचाऱ्यांनी त्याचे वाहन थांबवले. कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने वाहनाचे फोटो काढले आणि अवैधपणे टोल वसूल केला असा आरोप करण्यात आला आहे.
महिलांच्या शौचालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचा आरोप
या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे जेव्हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात टोल प्रशासनाने महिलांच्या शौचालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचा आरोप करण्यात आला होता. स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे की, शौचालयासारख्या ठिकाणी कॅमेरे बसवणे हे गोपनीयतेचे उल्लंघन करणारी बाब आहे.
टोल व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर कारवाईची मागणी
विक्रांत त्यागी यांनी तक्रारीत म्हटले की, वाहनांचे छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरे बसवणे आणि नंतर मनमानी पद्धतीने पैसे आकारणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. लोकांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर हे कॅमेरे बसवण्यात आले. तक्रारीनुसार, ही घटना 11:30 च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु तयार झालेल्या पावतीमध्ये रात्री 8:46 वाजताची वेळ दर्शवलेली आहे. वेळेच्या या फरकामुळे टोल व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
हे ही वाचा : विवाहित प्रेयसीने गोड बोलून प्रियकराला पुण्याहून 'तिथं' बोलावलं, नवऱ्यासमोरच केला कांड
दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता, स्थानिकांनी आणि पीडितेने प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. टोल प्लाझावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले आहे. तसेच शौचालयात कॅमेरा बसवण्यामागील नेमका हेतू काय याचा तपास केला पाहिजे. टोल व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. बालानी पोलिसांनी सांगितले की, आरोपीची चौकशी केली जात आहे. कॅमेरे बसवल्याप्रकरणी तसेच खंडणीबाबतचे प्रकरण उघड झाल्यास दोषींना सोडले जाणार नाही.
ADVERTISEMENT











