सॉफ्टवेअर इंजिनिअरची बायको 'त्या' गोष्टीला वैतागाली, नको ते केलं अन्...

Crime News : कौटुंबिक कलहातुन महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे. मृत महिलेचं नाव सुषमा (वय 35) असे आहे. घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ती एका टेक कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. धक्कादायक बाब म्हणजे, बंगळुरु शहरात एका आठवड्यात घडलेली ही दुसरी दुर्दैवी घटना आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 07:42 PM • 05 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पती आणि कुटुंबाने हुंड्यावरून पीडितेचा छळ केल्याचा आरोप

point

कौटुंबिक कलहातूनच पीडितेनं गळफास घेत जीवन संपवलं

Crime News : कौटुंबिक कलहातुन महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे. मृत महिलेचं नाव सुषमा (वय 35) असे आहे. घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ती एका टेक कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. धक्कादायक बाब म्हणजे, बंगळुरु शहरात एका आठवड्यात घडलेली ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. या घटनेनं शहर हादरून गेले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सुनेकडून हवी होती 'ती' गोष्ट, नवऱ्यानेही तेच सांगितलं.. विवाहितेने सगळ्यांनाच दिला धक्का!

हुंड्यावरून छळाचे आरोप

वृत्तानुसार, पोलिसांनी घटनेचं कारण शोधण्यासाठी तपास सुरु केला आणि हुंड्यावरून छळाचे आरोप करण्यात आहेत. मृत सुषमा आणि पुनीत कुमार यांचा विवाह होऊन पाच वर्षे झाले होते, असे वृत्त आहे. पीडित विवाहित मुलगी कौटुंबिक वादांमुळे त्रस्त झाली होती, त्या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. 

पती आणि कुटुंबाने हुंड्यावरून पीडितेचा छळ केल्याचा आरोप

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं की, पीडितेच्या कुटुंबाचे याआधी देखील वारंवार वाद व्हायचे अशी तक्रार केली होती. सुषमाच्या नातेवाईकांनी पती आणि कुटुंबाने हुंड्यावरून पीडितेचा छळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांचं म्हणणे असे की, सुषमा आणि तिची सासू यांच्यात काही कारणांवरून विनाकारण वाद व्हायचे. 

कौटुंबिक कलहातूनच पीडितेनं गळफास घेत जीवन संपवलं

प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सुषमा आणि तिच्या सासूमध्ये स्वयंपाकावरून हा वाद झाला. सुषमाच्या कुटुंबाचा आरोप आहे की, तिची सासू तिला स्वयंपाक करू देत नव्हती. तसेच तिला अनेकदा त्रास द्यायची. कौटुंबिक कलहातूनच पीडितेनं गळफास घेत जीवन संपवलं, या घडलेल्या घटनेनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली. 

हे ही वाचा : काकीच्या बेडरूममध्ये शिरला अन्... 17 वर्षीय पुतण्याने गोळी झाडून केली हत्या! नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. दरम्यान पीडितेच्या सासूचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.  

    follow whatsapp