'मुलीचा घटस्फोट घे आणि माझ्याशी लग्न जुळव, तरुणीच्या वडिलांचा नकार; प्रियकराने हातोड्याने बापाला ठेचून ठार मारलं

Crime news : तरुणाने एका विवाहित तरुणीच्या वडिलांची हत्या केली. विवाहित तरुणीला तिच्या नवऱ्याकडून घटस्फोट घेण्याची धमकी दिली, पण तरुणीच्या वडिलांनी नकार दिला असता, तरुणीच्या वडिलांना दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावले आणि डोक्यात हातोड्याने हल्ला करून ठार मारलं.

Crime news

Crime news

मुंबई तक

30 Apr 2026 (अपडेटेड: 30 Apr 2026, 02:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजवीरच्या मुलीने तिच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला

point

तरुणीच्या बापाचा खून करण्यामागं पंकजचा वेगळा समज

Crime news : उत्तराखंडच्या बहादराबाद पोलीस ठाणे परिसरातच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाने एका विवाहित तरुणीच्या वडिलांची हत्या केली. विवाहित तरुणीला तिच्या नवऱ्याकडून घटस्फोट घेण्याची धमकी दिली, पण तरुणीच्या वडिलांनी नकार दिला असता, तरुणीच्या वडिलांना दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावले आणि डोक्यात हातोड्याने हल्ला करून ठार मारलं. या प्रकरणात लग्नासाठी तगादा लावणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव पंकज असे आहे. तर मृत वडिलांचे नाव राजवीर असे आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : शिवसेनेचं ठरलं! विधान परिषदेसाठी दिले 'हे' दोन उमेदवार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

आरोपीकडून गुन्ह्याचा कबुलीनामा 

एसएसपी नवनीत सिंह भुल्लर यांच्या माहितीनुसार, राजवीरचा मृतदेह घटनास्थळी आढळून आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि डिजीटल पुराव्यांची तपासणी केली. तपासादरम्यान, एका संशयास्पद मोबाईल नंबर आढळून आला, ज्यामुळे पंकजची ओळख पटली. पंकजला कालियार रोडवर पकडण्यात आले, तेव्हा त्याने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. 

त्याने सांगितलं की, तो राजवीरसोबत सिडकुल कंपनीत काम करत होता. तरुणीच्या प्रेमापोटी त्याने राजवीरचाच काटा काढला. पंकजने हा गुन्हा एकट्याने केला नसून, त्याचा साथीदार छोटालाल देखील यात सामील होता. पंकजच्या माहितीनुसार, पोलिसांनी छोटालालला रुळावरून अटक केली. 

राजवीरच्या मुलीने तिच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला

दोन्ही आरोपींनी मिळून राजवीरला बांगला अंडरपासनजीकच्या पॉपलरच्या शेतात नेऊन त्याची हत्या केली. हत्येसाठी वापरण्यात आलेला हातोडा, बाईक, मृताचा मोबाईल फोन, पर्स आणि सामान आरोपींकडून जप्त करण्यात आले. अशातच चौकशीदरम्यान पंकज राजवीरच्या मुलीने तिच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला होता, परंतु वडील राजवीरच्या भीतीमुळे ती तयारच होतच नव्हती. 

हे ही वाचा : पुणे : कोंढव्यात क्लोरीन गॅसच्या गळतीने खळबळ, 24 जण रुग्णालयात दाखल

तरुणीच्या बापाचा खून करण्यामागं पंकजचा वेगळा समज

दरम्यान, पंकजचा असा समज होता की, राजवीरच्या खूनानंतर त्याच्या लग्नाचा मार्ग मोकळा होण्यास सोपं जाईल. पोलिसांनी दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.