आत्याच्या मुलाने केली महिला हॉकीपटूची हत्या, 'त्या' एका कारणामुळे चाकूने सपासप वार, परिसरात रक्ताचा सडा

Crime News :  चंदीगडच्या सेक्टर-38 मध्ये गुरुवारी रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. घराच्या वादातून एका उदयोन्मुख राज्यस्तरीय महिला हॉकी खेळाडूची म्हणजेच तानियाची, तिच्या आत्येभावाने चाकू भोसकून हत्या केली. विशेष म्हणजे, शुक्रवारी तानिया एका महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटकला रवाना होणार होती, मात्र त्याआधीच तिची जीवनज्योत मालवली.

Crime News

Crime News

मुंबई तक

06 Mar 2026 (अपडेटेड: 06 Mar 2026, 01:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आत्याच्या मुलाने केली महिला हॉकीपटूची हत्या

point

'त्या' एका कारणामुळे चाकूने सपासप वार, परिसरात रक्ताचा सडा

Crime News : चंदीगडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका स्टेट लेव्हलच्या महिला हॉकीपटूची तिच्याच आत्याच्या मुलानेच निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे क्रीडा जगतात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

मैदानावर उतरण्यापूर्वीच ‘खेळ’ संपला: चंदीगडमध्ये राज्यस्तरीय हॉकीपटू तानियाची हत्या

 चंदीगडच्या सेक्टर-38 मध्ये गुरुवारी रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. घराच्या वादातून एका उदयोन्मुख राज्यस्तरीय महिला हॉकी खेळाडूची म्हणजेच  तानियाची, तिच्या आत्येभावाने चाकू भोसकून हत्या केली. विशेष म्हणजे, शुक्रवारी तानिया एका महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटकला रवाना होणार होती, मात्र त्याआधीच तिची जीवनज्योत मालवली.

हेही वाचा : भारताचा 'हा' जुना मित्र बनणार संकटमोचक, 95 लाख बॅरल कच्चे तेल पाठवणार; भारताकडे 'इतकाच' तेलसाठा शिल्लक

घराच्या मालकी हक्कावरून होता वाद

मिळालेल्या माहितीनुसार, तानियाचे वडील रवी हे व्यवसायाने ऑटो चालक आहेत. ते सेक्टर-38 मधील घरात आपल्या कुटुंबासह राहतात. याच घराच्या पहिल्या मजल्यावर त्यांची बहीण (तानियाची आत्या) आपल्या कुटुंबासह राहते. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही कुटुंबांमध्ये घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता.

नेमकी घटना काय घडली?

गुरुवारी दुपारी घराच्या वादावरून तानियाचे वडील रवी आणि त्यांचा भाचा कृष्णा यांच्यात जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि कृष्णासह त्याच्या कुटुंबातील 6 जणांनी रवी यांच्यावर हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी तानिया मध्ये आली असता, आरोपी कृष्णाने तिच्या कमरेवर चाकूने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत तानियाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प, राज्यातील नागरिकांना काय मिळणार?

देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न अधुरे

तानिया केवळ एक हुशार विद्यार्थिनीच नव्हती, तर ती चंदीगड हॉकी टीमची एक उत्कृष्ट 'फॉरवर्ड' खेळाडू होती. ती पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती आणि पंजाब युनिव्हर्सिटीच्या मैदानावर सराव करायची. आपल्या खेळाच्या जोरावर ती राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी सज्ज होती. शुक्रवारी ती एका मोठ्या स्पर्धेसाठी जाणार होती, पण त्याआधीच एका कौटुंबिक वादाने तिचा बळी घेतला.

6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी सेक्टर-39 पोलीस ठाण्यात तानियाचे वडील रवी यांच्या तक्रारीवरून कृष्णा, रवी, गगन, अनिकेत, नवीन आणि टीना या 6 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 


बदलापूर : मोबाईल फोनमधील मॅसेज डिलीट झाला म्हणून 36 वर्षीय मुलाने जन्मदात्या आईचाच गळा आवळला...

    follow whatsapp