Crime News : प्रेम प्रकरणातून हत्या होणं हे फक्त काही सर्वसामान्यांपुरतं मर्यादित नाही. राजकीय नेतेदेखील याला बळी पडताना दिसतात. अशाच एक शेतकरी नेता असलेल्या महिलेची प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचे समोर आले आहे. आंचल मिश्रा (35) असं यांचं नाव असून प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाली होती. किसान युनियनच्या सभेला जात असल्याचं सांगून त्या घरातून बाहेर पडल्या होत्या. यानंतर त्या बेपत्ता झाल्या. यानंतर त्यांच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सांगली हादरली! दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षांनंतर त्यांच्या सहकाऱ्याची हत्या, मृतदेह बॅरलमध्ये कोंबून विहिरीत फेकला
प्रेमसंबंध आणि पैशांची मागणी
सुरज वर्मा असं आरोपीचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे आणि आंचलचे गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. सुरजच्या दाव्यानुसार, आंचल त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती आणि पैसे न दिल्यास पोलीस तक्रार करण्याची धमकी देत होती. याच त्रासाला कंटाळून आणि भीतीपोटी सुरजने 17 फेब्रुवारी रोजी तिला जंगलात नेऊन तिचा काटा काढण्याचा कट रचला. तिथे त्याने आंचलचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलातच सोडून दिला.
आरोपीचे नाटक उघड
धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपी सुरज वर्मा हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतः आंचलच्या पतीसोबत तिला शोधण्याचे नाटक करत होता. मात्र, संशय बळावल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मृत आंचलच्या मोबाइलचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले असता, सुरजचा खोटेपणा उघड झाला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा मान्य केला. आरोपीच्या सांगण्यावरून 3 मार्च रोजी ककरदरी जंगलातून आंचलचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह आणि जळालेले कपडे जप्त करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : जालना : गहू काढण्याच्या मळणी यंत्रात अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू,..दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ
कपड्यांच्या आधारे ओळख पटली
घटनास्थळावरून मिळालेल्या कपड्यांच्या आधारे पती संतोष मिश्रा यांनी आंचलची ओळख पटवली आहे. भिनगा क्षेत्राचे क्षेत्राधिकारी सतीश कुमार शर्मा यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी आरोपी सुरज वर्मा विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवले आहे. आरोपीचा जुना गुन्हेगारी इतिहास देखील समोर आला असून, त्या दिशेने पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











