रुममध्ये सापडला तरुणीचा सडलेला नग्नानस्थेतील मृतदेह, आजूबाजूला विखुरल्या होत्या 'त्या' गोष्टी

मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की तो सडायला सुरुवात झाली होती, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. स्थानिक रहिवाशांनी घरातून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

Crime News

Crime News

मुंबई तक

28 Apr 2026 (अपडेटेड: 28 Apr 2026, 10:42 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रुममध्ये सापडला तरुणीचा सडलेला नग्नानस्थेतील मृतदेह

point

आजूबाजूला विखुरल्या होत्या 'त्या' गोष्टी

Crime News : कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराच्या आडुगोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 34 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या भाड्याच्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की तो सडायला सुरुवात झाली होती, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. स्थानिक रहिवाशांनी घरातून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

हे वाचलं का?

कुजलेल्या अवस्थेत आढळला नग्नावस्थेतील मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणी मूळची झारखंड राज्यातील रहिवासी होती. ती गेल्या काही काळापासून बेंगलोरमध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होती. काही दिवसांपूर्वीच तिने एका खासगी कंपनीतील आपली नोकरी सोडली होती आणि सध्या ती बेरोजगार होती. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणीचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा, कारण मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संशयाचे वातावरण पसरले आहे.

हे ही वाचा : 'भाजपचं जिल्हा उपाध्यक्ष व्हायचं असेल तर माझ्यासोबत चल..', जिल्हाध्यक्षाने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप

खासगी कंपनीचा आयडी सापडला

घटनेचा पंचनामा करताना पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. तरुणीचा मृतदेह खोलीत विवस्त्र अवस्थेत सापडला, ज्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. खोलीची झडती घेतली असता पोलिसांना तिथे एका खासगी कंपनीचे ओळखपत्र आणि अनेक फाडलेले कागद विखुरलेल्या अवस्थेत सापडले आहेत. खोलीतील सामानाची झालेली अस्तव्यस्त स्थिती पाहता, मृत्यूआधी तिथे काहीतरी झटापट झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हे ही वाचा : मुंबई : बीएमसी कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलिसांनी 24 तासात कसा लावला छडा?

बलात्कार अन् नंतर खून?

पोलीस या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी करत असून, ही घटना बलात्कार आणि त्यानंतर केलेला खून असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जात आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.