Crime News : उत्तर प्रदेशातील बडौत-दिल्ली महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चार तरुणांनी एका महिलेशी गैरवर्तन केले. महिलेला 'काकी आय लव यू असं' म्हणत, तिच्याशी अश्लील कृत्य केले. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी रुग्णालयातून घरी परतताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : सूर्य आणि मंगळ ग्रहाची युती, मे महिन्याच्या 'या' तारखेपासून काही राशींचं नशीब पालटेल
चार तरुणांनी 'आंटी आय लव्ह यू' म्हणत महिलेला छळलं
या प्रकरणादरम्यान चारचाकी वाहनातून चार तरुण समोर आले, त्यांनी गाडीची काच खाली केली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या माहितीनुसार, आरोपींनी आधी आंटी आय लव्ह यू असं म्हणत पीडितेचा विनयभंग केला. नंतर थोड्या अंतरावर जाऊन रस्ता आडवण्याचं काम केलं. आरोपी एवढ्यावरच न थांबत नाहीत, त्यांनी महिलांप्रति अश्लील हावभाव करत घाणेरड्या टिप्पण्या केल्या.
आरोपींच्या चेहऱ्यावर वाजले बारा
गुन्हेगारांना वाटले की, महिला भयभीत झाली, पण पीडितेनं तात्काळ आपला मोबाईल फोन काढून पोलिसांना कळवण्यासाठी 112 वर फोन केला. पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजताच, चारही आरोपींच्या चेहऱ्यावर बारा वाजले. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत शुभम, विक्रांत आणि विनीत यांच्यासह तिघांना रंगेहाथ पकडलं, तसेच त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून पळून गेला.
अशातच पोलिसांनी आरोपीच्या गाडीचा तपास केला असता, गाडीत दारूच्या बाटल्या आढळून आल्या, आरोपी दारूच्या नशेत होता. महामार्गावर तरुण उद्धटपणे वागत होते, पोलीस ठाण्यात पोहोचताच त्यांनी पोलिसांना माफी मागितली.
हे ही वाचा : मुंबई हादरली, आधी बिर्याणी अन् झोपताना सर्वांनी कलिंगड खाल्लं, सकाळी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, काय घडलं?
पीडितेनं सांगितलं की, आम्ही नर्सिंग होममधून परतताना या लोकांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्याने अश्लील कृत्य करत त्यांनी विनयभंग केला. आम्ही न घाबरता पोलिसांना बोलावले आणि त्यांना अटक करण्यात आली. सध्या, पीडितेच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात पाठवले.
ADVERTISEMENT











