Crime News : भोपाळमधील कोलार परिसरात प्रेमसंबंध आणि संशयातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या प्रियकराला परत मिळवण्यासाठी एका महिलेने क्रूरतेचा कळस गाठला. तिने आपल्या मुलाच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने हॉटेलच्या रिसेप्शनिस्टचे अपहरण केले आणि त्यांच्याकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत वेळीच हस्तक्षेप केला. यामुळे पीडितेची सुरक्षित सुटका झाली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला आणि तिच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
विनीताचे दीपकसोबत प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, विनीता (36) ही महिला पतीपासून वेगळी राहून हॉटेल व्यावसायिक दीपक याच्याशी प्रेमसंबंधात होती. विनीता दीपकवर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. विनीताच्या सततच्या दबावाला कंटाळून दीपक ग्वाल्हेरला निघून गेला. दीपकचे हॉटेलमधील नवीन रिसेप्शनिस्टसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय विनीताला होता. याच संशयातून तिने पीडित तरुणीचा छळ करण्याचा कट रचला. शुक्रवारी (24 एप्रिल) संध्याकाळी विनीताचा मुलगा बिट्टू आणि त्याचा मित्र ग्राहक बनून हॉटेलमध्ये शिरले आणि पाणी नसल्याची खोटी तक्रार करून त्यांनी रिसेप्शनिस्टला खोलीत बोलावून तिला डांबून ठेवले.
हे ही वाचा : जावयाचा सासरवाडीत धुमाकूळ, बायको अन् सासूची केली हत्या, चार वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह
मुलगा आणि त्याच्या मित्राकडून अत्याचार
काही वेळातच विनीता तिथे पोहोचली आणि तिघांनी मिळून तरुणीला बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, विनीताच्या सांगण्यावरून तिच्या मुलाने आणि त्याच्या मित्राने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. दीपकला परत बोलावण्यासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आला. मात्र तिने यासाठी नकार दिल्यावर तिला अतोनात यातना देण्यात आल्या. रात्री नऊच्या सुमारास हे आरोपी पीडितेचे अपहरण करून तिला स्कूटीवरून ग्वाल्हेरला नेण्यासाठी निघाले होते, जेणेकरून दीपकवर थेट दबाव टाकता येईल. जाताना पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेला.
हे ही वाचा : मर्डर करुन मृतदेह जाळला अन् नंतर शेतात नेऊन पुरला, नुकतंच लग्न झालेल्या रुपासोबत काय घडलं?
आई अन् मुलाला अटक, मित्र फरार
सुदैवाने, बाहेर पडताना आरोपींनी केलेल्या मारहाणीचा प्रकार काही नागरिकांनी पाहिला आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. कोलार पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचे लोकेशन ट्रेस केले आणि बजरिया पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करून पीडितेची सुटका केली. डीसीपी मयूर खंडेलवाल यांनी सांगितले की, जुन्या प्रेमसंबंधातून आणि संशयातून ही क्रूर घटना घडवण्यात आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी विनीता आणि तिच्या मुलाला बेड्या ठोकल्या असून, फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT











