बायकोच्या प्रियकराने दिली धमकी, घाबरून नवऱ्याने केली आत्महत्या; दोन ओळींच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

बायकोच्या प्रियकराने धमकी दिल्यानंतर नवऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी नवऱ्याने दोन ओळींची चिठ्ठी लिहिली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

28 Apr 2026 (अपडेटेड: 28 Apr 2026, 04:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोच्या प्रियकराने दिली धमकी

point

घाबरून नवऱ्याने केली आत्महत्या

point

दोन ओळींच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

Crime News : बायकोच्या प्रियकराने दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे दहशतीत आलेल्या एका गवंड्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील हमिरपूर परिसरातील मुस्करा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. झडतीदरम्यान पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदयद्रावक आहे.

हे वाचलं का?

बायकोला रंगेहात पकडले

धर्मपाल बैजनाथ (40) असे  मृत व्यक्तीचे नाव असून तो गवंडीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मपालने आपल्या बायकोला भरत कुशवाहा नावाच्या व्यक्तीसोबत रंगेहात पकडले होते. या प्रकारानंतर आरोपी भरत कुशवाहा आणि त्याचा भाऊ शिवकुमार यांनी धर्मपालला धमकावण्यास सुरुवात केली होती. 'जर पोलिसांत तक्रार केली, तर तुम्हा दोघांनाही जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिल्याने धर्मपाल प्रचंड मानसिक दडपणाखाली होता.

हे ही वाचा : डोंबिवली : 'चल पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार करु', पण मित्राने तरुणीला नेलं निर्जनस्थळी; अन्...

गळफास घेऊन केली आत्महत्या

याच दहशतीतून धर्मपालने आपल्या राहत्या घरी शिडीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच मुस्करा पोलीस आणि फील्ड युनिटचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असता धर्मपालच्या खिशात एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये त्याने दोन्ही भावांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूला जबाबदार धरले आहे. 'रिपोर्ट करायला जाल तर मारून टाकू,' अशी धमकी दिल्याचे या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा : बारामती : 13 वर्षीय मुलीवर 55 वर्षीय पुरुषाकडून लैंगिक अत्याचार, संशयित आरोपीनं पोलीस कोठडीत संपवली जीवनयात्रा

पोलिसांत अधिकृत तक्रार नाही

सध्या फील्ड युनिटने घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले असून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे धर्मपालच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अद्याप पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. पोलीस आता सुसाईड नोट आणि कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.